Taslima Nasrin Slams Sushmita Sen : सुष्मिता सेन (Sushmita Sen) व ललित मोदींच्या (Lalit Modi ) रिलेशनशिपवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी सुष्मिताला पाठींबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. आता सुष्मिता व ललित मोदींच्या लव्ह अफेअरवर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin ) यांनी प्रतिक्रिया देत, सुष्मितावर जोरदार निशाणा साधला आहे.
तस्लिमा यांनी 15 जुलैला याबद्दलचं पहिलं ट्विट केलं होतं. गेल्या 15 जुलैला ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहिर केलं होतं. सुष्मिताला अशा कुठल्याही पुरूषाची गरज नाही, असं तस्लिमा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आता तस्लिमा यांनी फेसबुकवर बंगाली भाषेत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सुष्मितावर पैशांसाठी विकली गेल्याचा आरोप केला आहे.
तस्लिमांची एफबी पोस्ट