‘रसना’ची टीव्हीवर येणारी जाहिरात तुम्हाला आठवत असेलच. आय लव्ह यू रसना म्हणत सर्वांचं मनं जिंकणारी या जाहिरातीतील क्युट चिमुकलीही तुम्हाला नक्कीच आठवत असणार. तिचे नाव तरूणी सचदेव. दुर्दैवाने तरूणी आज आपल्यासोबत नाही. अगदी वयाच्या उण्यापु-या 14 व्या वर्षी तरूणीने जगाचा निरोप घेतला होता. वाढदिवसाच्या दिवशीच तरूणीवर काळाने झडप घातली आणि तरूणी हे जग सोडून गेली. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, तरूणीने अगोदरच तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.
वाढदिवसाच्या दिवशीच अपघात...
14 मे 2012 रोजी तरूणीचा 14 वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात 16 भारतीय, 2 डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते. अचानक सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास या विमानाला अपघात झाला व विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. त्या अपघातात 15 लोक ठार झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता़ विमानातील सहा प्रवासी मात्र सुदैवाने बचावले होते.
तरुणीने स्वत: मंदिरातील अनेक उत्सवांच्या अनेक नाटकांमध्येही भाग घेतला होता. तरूणी वयाच्या 5 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली. आणि तीही तिच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार ठरली होती. स्टार प्लसचा शो ‘क्या आप पाचवी पास से तेज है?’ या स्पर्धेतही स्पर्धक होती. त्यावेळी शाहरुख खान हा शो होस्ट करत असे. त्यांनी 2004 मध्ये मल्याळम चित्रपट ‘वेल्लीनक्षत्रम’ मधून डेब्यू करत तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘पा’ या सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भूमिका साकारली होती.