Join us

म्हणून तारा सुतारियाने सोडला शाहिद कपूरचा 'कबीर सिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 16:23 IST

अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे.

ठळक मुद्दे ताराला कबीर सिंग सिनेमाची ऑफर देखील आली होती 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे बरेच शूटिंग बाकी होता म्हणून तिला 'कबीर सिंग' सोडावा लागला

अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. याशिवाय ताराला कबीर सिंग सिनेमाची ऑफर देखील आली होती. हा सिनेमा दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे. यात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा आता कियारा आडवाणीला मिळाला आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ज्यावेळी ताराला 'कबीर सिंग'ची ऑफर आली तेव्हा 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे बरेच शूटिंग बाकी होता म्हणून तिला 'कबीर सिंग' सोडावा लागला. मात्र तरीही तारा स्वत:ला नशीबवान समजते कारण तिला त्यानंतर 'मरजावां' सिनेमा मिळाला. कबीर सिंग पहिला सिनेमा नाहीय ज्यासाठी ताराने नकार दिला तिने अलादीन सिनेमादेखील ट्रेनिंग घेतानामध्येच सोडून देऊन 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमासाठी भारतात परत आली होती.  

'मरजावां'मध्ये तारा  ती सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट दिसणार आहे याशिवाय ताराची ‘आरएक्स 100’ सिनेमात वर्णी लागली आहे. ‘आरएक्स 100’ या तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. यात सिनेमातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.

दिग्दर्शन मिलन लुथरिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे तर सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे.  ऐकूणच काय तर रिलीज आधीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत. 

टॅग्स :तारा सुतारियास्टुडंट ऑफ द इअर 2टायगर श्रॉफ