Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटी ऑफ 'ब्लॅक अँड व्हाईट', तारा सुतारियाने शेअर केलेला फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 15:00 IST

ताराने तिचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या अफेअरमुळे किंवा आगामी सिनेमामुळे ती चर्चेत आली असे नसून यावेळी तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे. ताराने तिचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तारा खूपच सुंदर दिसते आहे. तारा या फोटोत आरशात बघून पोज देताना दिसतेय. 90च्या दशकात परत जाऊ, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. ताराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर तारा लवकरच तेलुगूमधील हिट  'आरएक्स 100'च्या बॉलिवूड रिमेक 'तडप'मध्ये दिसणार आहे. तडप चित्रपटात एक लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. या सिनेमातून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २४ सप्टेंबर, २०२१ ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याशिवाय तारा 'एक व्हिलन' आणि 'हिरोपंती 2'मध्ये देखील दिसणार आहे. 

तारा आदर जैनला डेट करते आहे. ताराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघे काही महिन्यांपूर्वीच मालदीवला गेले होते. आदर जैन लवकरच गर्लफ्रेंड तारा सुतारियासोबत सात फेरे घेणार आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सीरियस आहेत आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :तारा सुतारिया