Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारा सुतारिया अन् वीर पहाडियाचं ब्रेकअप? एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:21 IST

तारा सुतारिया अन् वीर पहाडियामध्ये बिनसलं? एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

Tara Sutaria And Veer Pahariya: अभिनेत्री तारा सुतारिया आणि महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पाहाडिया हे सेलिब्रिटी कपल मागील काही दिवसांपासून सात्यत्याने चर्चेत आहेत. अलिकडेच तारा ही मुंबईमध्ये लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये बॉयफ्रेंड वीर पहाडियासोबत पोहोचली होती. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या दोघांची सगळीकडे चर्चा होऊ लागली.या कॉन्सर्टमध्ये घडल्या प्रकारानंतर वीर आणि ताराच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं कळतंय. या सेलिब्रिटी कपलचा ब्रेकअप झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

तारा सुतारिया आणि वीर पहाडिया मागील वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडीला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे.पार्ट्यांमध्ये एकत्र दिसणं,  सोशल मीडियावरील पोस्ट, कमेंट यावरुन या जोडप्याच्या नात्याबद्दलच्या चर्चांनी अधिकच जोर धरला. वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेचा नातू आहे. काही दिवसांपूर्वीच ताराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ती मंचावर एपी ढिल्लनला मिठी मारताना दिसली होती. तर गायकाने तिच्या गालावर किस केलं होतं. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड तिला पाहून नाराज दिसला होता.यावर तारा सुतारियाने याला तिच्या विरोधात पैसे देऊन चालवलेली मोहीम म्हटलं होतं. फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा आणि वीर यांचं  ब्रेकअप झालं आहे. परंतु, या सगळ्यावर दोघांपैकी कोणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या नक्की अफवा आहेत की सत्य हे लवकरच कळेल.

दरम्यान,एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधीस  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ताराने स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. "खोटेपणा, एडिटिंग आणि पीआर हे आम्हाला अजिबात हादरवू शकत नाहीत. शेवटी प्रेम आणि सत्याचा नेहमीच विजय हो.  त्यामुळे टोमणे मारणाऱ्यांवरच हा विनोद उलटतो". 

वीर पहाडिया काय म्हणालेला?

अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट करत वीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कमेंटमध्ये स्पष्ट केले की, "माझ्या प्रतिक्रियेचं जे फुटेज दाखवलं गेलं, ते प्रत्यक्षात 'थोडी सी दारू' या गाण्यादरम्यानचं नाही तर दुसऱ्या गाण्यादरम्यानचं होतं. जोकर्स..." असं म्हणतं वीरनं तो नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच ताराच्या या पोस्टवर ताराच्या पोस्टवर  एपी ढिल्लों याने "क्वीन" अशी कमेंट करत तिचं समर्थन केलं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Tara Sutaria and Veer Pahariya breakup rumors surface after concert video.

Web Summary : Rumors suggest Tara Sutaria and Veer Pahariya may have broken up after a video from an AP Dhillon concert went viral. Both have addressed the situation online, but haven't confirmed or denied the breakup reports.
टॅग्स :तारा सुतारियाबॉलिवूडसेलिब्रिटी