Join us

'पिंक'नंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकत्र, सुजॉय घोषच्या दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 16:19 IST

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. २०१६ मध्ये आलेल्या शूजीत सरकारच्या 'पिंक' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा दिसणार एकत्र

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. २०१६ मध्ये आलेल्या शूजीत सरकारच्या 'पिंक' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. यावेळी सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनीर खेत्रपाल करणार आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. 'बदला' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे सुजॉय घोष याचे दिग्दर्शन करणार असून अभिनेता शाहरुख खानचे या चित्रपटाशी खास नाते आहे.

सुजॉय घोषने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये बिग बींना पाहून तुम्हालाही ‘काँटे’ हा चित्रपट आठवल्याशिवाय राहणार नाही.‘बदला’ हा क्राइम- थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्याची पटकथा लिहिण्यास दहा वर्षांचा काळ लागला असं समजतंय. याची बरीचशी शूटिंग परदेशात झाली आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सुजॉय घोष यांने याआधी 2009मध्ये आलेल्या 'अलादीन'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रितेश देशमुख आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा होते. तापसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.  

टॅग्स :तापसी पन्नूअमिताभ बच्चन