Join us

तापसी पन्नूला ‘जोर का झटका’; ३६ हजार वीजबिलाप्रकरणी केली ‘अडानी’ला तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 18:21 IST

तापसी पन्नू या गोष्टीमुळे प्रचंड संतापली असून तिने अडानीला टिवटरवर चांगलेच फैलावर घेतले. तिने म्हटले आहे की,‘ एखादे चुकीचे यंत्र आहे का, ज्यामुळे हे असे जास्तीचे वीजबिल आकारले जाते? मला आश्चर्य वाटतेय की, या ३ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये असे कोणते यंत्र बिल्डिंगमध्ये खरेदी केले गेले किंवा वापरले गेले ज्यामुळे एवढी वीजबिल देण्यात आले आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री असूनही बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिला नुकताच ‘जोर का झटका’ बसला आहे. होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. तिला जून महिन्याचे बिल तब्बल ३६ हजार आल्याचे समजतेय. तिच्या नेहमीच्या बिलापेक्षा हे बिल दहापट जास्त असल्याचे तिने टिवटमध्ये सांगितले आहे. तिने ‘अडानी इलेक्ट्रिसिटी’ला तक्रार केली असून टिवटरवर तिला चाहत्यांचे मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत.

 तापसी पन्नू या गोष्टीमुळे प्रचंड संतापली असून तिने अडानीला टिवटरवर चांगलेच फैलावर घेतले. तिने म्हटले आहे की,‘ एखादे चुकीचे यंत्र आहे का, ज्यामुळे हे असे जास्तीचे वीजबिल आकारले जाते? मला आश्चर्य वाटतेय की, या ३ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये असे कोणते यंत्र बिल्डिंगमध्ये खरेदी केले गेले किंवा वापरले गेले ज्यामुळे एवढी वीजबिल देण्यात आले आहे. अडानी इलेक्ट्रिसिटी तुम्ही कशाप्रकारे ही आकारणी करत आहात, ते तरी सांगा.’

तापसी पन्नूने तिच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या बिलाचे स्क्रिनशॉट टिवटरवर पोस्ट केले आहेत. ज्यात एप्रिल महिन्यात तिला ४३९० रूपये एवढे बिल आले आहे. तर मे महिन्यात तिला ३८५० एवढे बिल आले आहे. ती पुढे सांगते,‘हे बिल त्या अपार्टमेंटचे आहे जिथे कोणीही राहत नाही. तिथे कधीतरीच कोणीतरी साफसफाईसाठी जाते. मला तर वाटतेय की,तिथे कोणीतरी राहत असणार त्याशिवाय एवढे बिल कसे येईल? अडानी तुम्ही खरी परिस्थिती काय आहे? याची चौकशी केलीय का? 

तापसीच्या सर्व ट्विट्सना चाहत्यांनी वेगवेगळया मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. एकाने लिहिले की,‘चित्रपटाच्या कलेक्शननुसार वीजबिल देण्यात येते. तर दुसऱ्याने लिहिले की, असे वाटते की, त्यांनी डेसिमलला गायब करून टाकले आहे. एवढंच नाही तर अली फजलनेही लिहिले की, ‘अडानी कडून पाठवलेल्या स्माईलिंग इमोजीची मला काहीतरी गडबड वाटते.’ यावर रिप्लाय करत तापसीने म्हटले की,‘त्यामुळे माझी स्माईल गायब होत आहे.’

टॅग्स :तापसी पन्नूबॉलिवूड