Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताहिरा कश्यपने दिला कॉलेजच्या दिवसांना उजाळा, आयुष्मान खुराणासोबतचा जुना फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 16:17 IST

ताहिरा कश्यपने कॉलेजच्या दिवसातील एका फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणासोबत दिसत आहे.

रायटर आणि फिल्ममेकर ताहिरा कश्यप सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव असते आणि अनेकदा तिच्यासंबंधी वेगवेगळ्या अपडेट्स फॅन्ससोबत शेअर करत असते. आता तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ताहिरा कश्यपने कॉलेजच्या दिवसातील एका फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणासोबत दिसत आहे.

ताहिरा कश्यपने रविवारी तिच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. यात ताहिरा आणि आयुष्मान खुराणासोबत त्यांची एक मैत्रीणही दिसत आहे. हा फोटो त्यांच्या कॉलेजमधील आहे. एका नाटकाच्या आधीचा हा फोटो आहे.

ताहिरा कश्यप आणि आयुष्मान खुराणा कॉलेजपासूनचे फ्रेन्ड आहेत. नंतर दोघे प्रेमात पडले आणि २००८ साली त्यांनी लग्न केलं. ताहिरा कश्यप आणि आयुष्मान खुराणाने २०१२ मध्ये विराजवीर आणि २०१४ मध्ये मुलीला जन्म दिला.

आयुष्मान खुराणाचा वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो अखेरचा सुजीत सरकारच्या 'गुलाबो सिताबो' मध्ये दिसला होता. यात तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसला होता. आता तो दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी 'चंडीगढ करे आशिकी'शूटींग करत आहे. यात तो वाणी कपूरसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :ताहिरा कश्यपआयुषमान खुराणाबॉलिवूड