Join us

'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये तापसी-विक्रांतसोबत दिसणार 'हा' अभिनेता, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 15:16 IST

पहिल्या पार्टमध्ये झळकलेल्या हर्षवर्धन राणेच्या जागी या भागात वेगळा अभिनेता आहे (phir ayi haseen dilruba)

२०२१ साली आलेल्या 'हसीन दिलरुबा' सिनेमाने वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा काहीच दिवसांपूर्वी झाली. 'हसीन दिलरुबा'च्या पुढच्या भागात कोणते कलाकार झळकणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर नेटफ्लिक्सने यावरचा पडदा बाजूला सारलाय. 'हसीन दिलरुबा'चा दुसरा भाग अर्थात 'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये हर्षवर्धन राणेच्या जागी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. तो म्हणजे सनी कौशल.

सनी कौशल 'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये!

'हसीन दिलरुबा'च्या सिक्वेलचं नवीन पोस्टर आज लॉंच झालाय. दोन पोस्टरपैकी एका पोस्टरमध्ये तापसी आणि विक्रांत एका छत्रीत दिसत असून सनी कौशल रेट्रो लूकमध्ये हातात गुलाबांचा गुच्छ घेऊन प्रेमळ लूकमध्ये तापसीकडे पाहताना दिसतोय. तर दुसरीकडे एका पोस्टरमध्ये सनी आणि तापसी एका छत्रीत असून विक्रांत बाहेर उभा राहिलेला दिसतोय. अशाप्रकारे 'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये विकी कौशलचा भाऊ सनी पाहायला मिळणार आहे.

 

 

'फिर आई हसीन दिलरुबा' कधी रिलीज होणार?

'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये यंदा पुन्हा एकदा रोमँटिक, सस्पेन्स आणि थ्रिलर अशा भावनांचं मिश्रण असलेलं कथानक बघायला मिळणार. 'फिर आई हसीन दिलरुबा' सिनेमा ९ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमात सनी कौशल, विक्रांत मेसी, तापसी पन्नू आणि जिमी शेरगिल हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :तापसी पन्नूसनी कौशलविक्रांत मेसी