अभिनेत्री तापसी पन्नूचीबॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे. तिने निवडलेले सिनेमे हे नेहमीच इतर मसालापटांपेक्षा वेगळे असतात. सध्या ती 'अस्सी' सिनेमात दिसत आहे. याआधी 'थप्पड','नाम शबाना', 'पिंक' सारखे महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या सिनेमातून तिने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या सिनेमांचे विषय नेहमी असेच का असतात यावर नुकतंच तिने भाष्य केलं. तसंच पती मॅथियास बोए तिच्या करिअरबद्दल काय विचार करतो यावरही तिने उत्तर दिलं.
तापसी पन्नूने तिच्या सिनेमांमधून आतापर्यंत महिला सबलीकरण, कौटुंबिक हिंसाचार आणि बलात्कार सारखे मुद्दे मांडले. आता पुढे आणखी कोणते मुद्दे आणणार असं विचारलं असता ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, "खरं सांगायचं तर सध्या असं काहीही ठरवलेलं नाही. माझ्याजवळ दोन-तीन स्क्रिप्ट्स आहेत त्यातील काही थेट आणि काही अप्रत्यक्षपणे समाजातील ठराविक धारणांवर भाष्य करतात. लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधून आपण बोध घ्यायचो तीच अपेक्षा माझी मनोरंजनातील विषयांकडूनही असते जेणेकरुन प्रेक्षकांना काहीतरी मिळावं. बऱ्याचदा चित्रपट केवळ मनोरंजनासाठीही बनवले जातात आणि तेही पाहिलेच पाहिजे. अस्सी लोकांना आवडावा आणि मला हवे तसे सिनेमे यापुढेही बनवू शकेन अशी मला आशा आहे."
पती मॅथियास बोएबद्दल तापसी म्हणाली, "एक माणूस म्हणून जेव्हा आपण एकमेकांमध्ये रुची घेतो तेव्हा एकमेकांचं प्रोफेशनमध्ये देखील आपण रस घेतो. पण दिवस रात्र त्यावरच चर्चा करु इतकंही नाही. मी त्याचे बॅडमिंटनचे सामने बघते. तो कोणाचा कोच आहे याची मला माहिती असते. आता तो फुलटाईम खेळाडू नाहीये. तो अनेकदा माझ्यासोबत आउटडोअर लोकेशनवर येतो. पण तो सेटवर कधीच येत नाही. त्याला सेटवर खूप कंटाळा येतो. पण माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी तो तिथे असतो. एकमेकांना ग्रो करण्यासाठी आमची एक खूप छान पद्धत आहे. आम्हाला आमच्या प्रोफेशनबद्दल एकमेकांची परवानगी घ्यावी लागत नाही. स्वत:च्या प्रोफेशनचे निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेतो. आम्ही एकाच क्षेत्रातले नाही तेही चांगलंच आहे."
Web Summary : Taapsee Pannu discusses her film choices, focusing on women's issues. She explains her husband, Mathias Boe, supports her career but finds film sets boring. They respect each other's professional independence and decisions.
Web Summary : तापसी पन्नू अपनी फिल्मों के चयन पर बात करती हैं, जो महिलाओं के मुद्दों पर केंद्रित हैं। उन्होंने बताया कि उनके पति, मथायस बोए, उनके करियर का समर्थन करते हैं लेकिन फिल्म सेट को उबाऊ पाते हैं। वे एक दूसरे की पेशेवर स्वतंत्रता का सम्मान करते हैं।