Join us

हजरजबाबी तापसी पन्नूने उत्तर ऐकून डिवचणाऱ्यांची बोलती बंद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 16:31 IST

तापसीचा ‘सूरमा’ हा चित्रपट अलीकडेचं रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला दाद दिली. पण बॉक्सआॅफिसवर मात्र हा चित्रपट दणकून आपटला ‘सूरमा’चे बॉक्सआॅफिसचे आकडे बघून एका युजरने तापसीला लक्ष्य केले.

सोशल मीडिया संवादाचे एक मोठे माध्यम आहे. पण सोशल मीडियाच्या वापराचे काही तोटेही आहेत. यापैकी एक तोटा म्हणजे, ट्रोलिंग. ट्रोलिंग नावाच्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर सेलिब्रिटींना अनेकदा अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागतात. अलीकडे तापसीलाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण तापसी ट्रोल करणाऱ्यांना पुरून उरली.तापसीचा ‘सूरमा’ हा चित्रपट अलीकडेचं रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला दाद दिली. पण बॉक्सआॅफिसवर मात्र हा चित्रपट दणकून आपटला ‘सूरमा’चे बॉक्सआॅफिसचे आकडे बघून एका युजरने तापसीला लक्ष्य केले. ‘बस्स, दोन-तीन चित्रपटानंतर तापसी पन्नू बॉलिवूडमधून बाहेर...’असे या युजरने लिहिले. केवळ इतकेच नाही तर या युजरने तापसीच्या दिसण्यावरूनही तिची खिल्ली उडवली. ‘बॉलिवूडची सगळ्यात खराब दिसणारी अभिनेत्री़ आशा करतो, ती पुन्हा दिसू नये ,’ असेही त्याने लिहिले.

तापसीच्या नजरेतून हे ट्रोलिंग सुटणारे नव्हतेच. मग काय तिनेही या ट्रोलरला जोरदार शालजोडीत दिले. ‘पण माझे तीन चित्रपट तर आधीच झाले आहेत, मुल्क, मनमर्जिया आणि बदला... तुझी निराशा केली, माफी मागते. पण मी दोन आणखी चित्रपट आधीच साईन केले आहेत. तुला मला आणखी थोडे झेलावे लागेल,’ असे तापसीने लिहिले.तापसीचे हे उत्तर ऐकून अनेकांनी तिचे स्वागत केले. तिच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केले. तापसीचा ‘मुल्क’ हा चित्रपट येत्या ३ आॅगस्टला रिलीज होतो आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटात तापसी वकीलाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एका मुस्लिम कुटुंबाच्या संघर्षाची कथत्त आहे. ऋषी कपूर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

 

 

 

टॅग्स :तापसी पन्नू