अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीने या वर्षी मार्चमध्ये तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्याशी लग्न केले. या जोडप्याने उदयपूरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले, पण त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाच सुगावा लागला नाही. तापसी पन्नूने मॅथियास बो(Mathias Boe)सोबतचे तिचे लग्न हे गुपित ठेवले होते आणि लग्नाच्या ९ महिन्यांनंतरही अभिनेत्रीने सोशल मीडियावर एकही फोटो शेअर केलेला नाही.
एजेंडा आजतकमध्ये नुकतीच तापसी पन्नू सहभागी झाली होती. त्यावेळी तिने तिच्या लग्नाशी संबंधित असा खुलासा केला ज्याने सर्व चकित झाले. अभिनेत्रीने सांगितले की, तिने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचा बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आणि लवकरच ती तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहे. तापसीने सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करून अधिकृतपणे लग्न केले आणि यावर्षी त्यांनी त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले.
लग्न गुप्त ठेवण्यात आले होतेतिचे लग्न गुप्त ठेवण्याबाबत आणि फंक्शनचा एकही फोटो शेअर न करण्याबाबत तापसी म्हणते, 'लोकांना माझ्या लग्नाबद्दल पूर्णपणे माहिती नव्हती कारण आम्ही कोणतीही घोषणा केली नव्हती. मागच्या वर्षीच आमचे लग्न रजिस्टर झाले. आमच्या लग्नाचा वाढदिवस लवकरच येत आहे. आज मी हे इथे उघड केले नसते तर कुणालाही कळले नसते.
तापसीला वैयक्तिक आयुष्य ठेवायचंय वेगळं तापसी पुढे म्हणते की, 'आम्हाला आमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवायचे होते. मी पाहिलंय की एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप जास्त खुलासा केल्याने त्याचा वैयक्तिक जीवनावर आणि व्यावसायिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. करिअरमधील यश आणि अपयश अनेकदा वैयक्तिक जीवनावरही परिणाम करतात, ज्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होतो. मी नेहमीच दोघांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे.
लग्नाला फक्त कुटुंबियच होते उपस्थितअभिनेत्रीने मार्चमध्ये तिने बॅडमिंटनपटू मॅथियास बोसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. बॉलिवूडमधून फक्त अनुराग कश्यप पाहायला मिळाला होता.