Tapsee Pannu : बॉलिवूडमधील दोन तगड्या अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू आणि कंगना राणौत. पण, या दोघांमधील शीतयुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी तापसी पन्नूला अनेकदा 'सस्ती कॉपी' किंवा 'बी-ग्रेड' अभिनेत्री म्हणून हिणवले होते, ज्यावर आता तापसी पन्नूने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या मुलाखतीत तापसीला २०१९ मधील त्या वादाबद्दल विचारण्यात आले, जेव्हा कंगनाची बहीण रंगोलीने तापसीला कंगनाची 'स्वस्त कॉपी' म्हटले होते. यावर तापसी म्हणाली, "ती टिप्पणी कंगनाने नाही, तर तिच्या बहिणीने केली होती. कदाचित मी चित्रपटांसाठी कंगनाइतके मानधन घेत नाही, म्हणून त्यांनी मला 'स्वस्त' म्हटलं असेल. पण कंगना इतकी हुशार अभिनेत्री आहे की, मला तिची कॉपी म्हटल्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. मी कधीही तिच्या विरोधात एक ओळही बोलले नाही".
तापसी आणि कंगना या दोघीही फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरून आल्या आहेत. त्यांच्यातील मतभेदाचा फायदा घराणेशाहीला किंवा 'स्टार किड्स'ना झाला का? या प्रश्नावर तापसीने सूचक उत्तर दिले. ती म्हणाली, "नक्कीच कोणाला तरी याचा फायदा झाला असेल. कदाचित काही लोकांना आम्ही दोघी एकत्र येण्याची भीती वाटत असावी, म्हणून आम्हाला वेगळं ठेवण्याचे प्रयत्न झाले असावेत".
"मैत्री करायला मी तयार"कंगना राणौतसोबतच्या भविष्यातील नात्याबद्दल तापसी अतिशय सकारात्मक दिसली. ती म्हणाली, "कंगना माझी वरिष्ठ आहे. मग तिला पाहिल्यावर मी आदराने नमस्कार का करू नये? मी नक्कीच तिच्याशी बोलेन. तिची प्रतिक्रिया काय असेल हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या वागण्याची मी हमी देऊ शकते. माझ्या मनात तिच्याबद्दल कोणताही द्वेष नाही". तापसीच्या या विधानानंतर आता कंगना राणौत यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Taapsee Pannu addresses being called a 'cheap copy' by Kangana Ranaut and her sister. She expressed openness to friendship, dismissing any animosity. Pannu suggested external forces might have fueled their differences, preventing collaboration.
Web Summary : तापसी पन्नू ने कंगना रनौत और उनकी बहन द्वारा 'सस्ती कॉपी' कहे जाने पर प्रतिक्रिया दी। उन्होंने दोस्ती के लिए खुलापन व्यक्त किया और किसी भी दुश्मनी को खारिज किया। पन्नू ने सुझाव दिया कि बाहरी ताकतों ने उनके मतभेदों को बढ़ाया होगा, जिससे सहयोग नहीं हो सका।