Assi Ott Release Date Zee5 : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला 'अस्सी' हा सिनेमा २० फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखालील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. आता थिएटरनंतर 'अस्सी' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
'आर्टिकल १५' आणि 'थप्पड ' सारखे दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अनुभव सिन्हा यांच्याकडून 'अस्सी' बाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. एक सकस 'कोर्टरूम ड्रामा' असूनही बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यात हा चित्रपट मागे पडला. मात्र, समीक्षकांनी तापसीच्या अभिनयाचे नेहमीप्रमाणेच कौतुक केले होते. आता 'अस्सी' हा येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे. त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांना आता घरी बसून पाहण्याची संधी मिळणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
'अस्सी' हा एक गंभीर कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटात महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटी यावर भाष्य करण्यात आले आहे. कथेत एका महिला शिक्षिकेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची आणि न्यायासाठीच्या तिच्या लढ्याची हृदयद्रावक गोष्ट दाखवण्यात आली आहे. तापसीशिवाय, नसीरुद्दीन शाह, सत्यजीत शर्मा, रेवती, मनोज पाहवा, सीमा पाहवा, सुप्रिया पाठक या कलाकारांनीही आपल्या भूमिकांना विशेष न्याय दिला. या चित्रपटाचे लेखन गौरव सोलंकी यांनी केले असून अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटात कोणत्याही एका पात्राला 'हिरो' बनवलं नाही. तर, त्यांनी कथेलाच केंद्रस्थानी ठेवलं आहे.
Web Summary : Taapsee Pannu's 'Assi,' a courtroom drama about sexual violence and judicial flaws, is set to release on ZEE5 on April 17, 2026. The film failed at the box office but received critical acclaim. It features a strong ensemble cast and gripping narrative.
Web Summary : तापसी पन्नू की 'अस्सी', यौन हिंसा और न्यायिक कमियों पर आधारित एक कोर्टरूम ड्रामा, 17 अप्रैल, 2026 को ZEE5 पर रिलीज़ होने के लिए तैयार है। फिल्म बॉक्स ऑफिस पर असफल रही लेकिन समीक्षकों ने सराहा। इसमें कलाकारों की मजबूत टुकड़ी और मनोरंजक कहानी है।