Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पहले भाई था अब जान बन गया' स्वराचे १५ दिवसांपूर्वीचे ट्वीट व्हायरल, नवऱ्याला म्हणाली 'भाई'; आता होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 10:09 IST

स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी येताच सर्वांना धक्का बसला आहे.

Swara Bhaskar : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काल चाहत्यांना धक्काच दिला. गुपचुप कोर्ट मॅरेज करत तिने लग्न झाल्याचे जाहीर केले. समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद जिरार अहमद (Fahad Ahemed) याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने सर्वांनाच हे सरप्राईज दिले. विशेष म्हणजे दोघांची भेट ही सीएए एनआरसी (CAA NRC) विरोधातील आंदोलनातच झाली होती. या आंदोलनातून स्वराने नेहमीच सरकारवर आवाज उठवला आहे. अनेकदा तिची विधानं वादग्रस्त राहिली आहेत. दरम्यान आता स्वराचं जुनं ट्विट व्हायरल होत आहे. त्या ट्विटमध्ये तिने फहादला 'भाई' असे संबोधले आहे.

स्वरा भास्करची अचानक लग्नाची बातमी ऐकताच सर्वच अवाक झाले. त्यातच आता स्वराचे १५ दिवसांपूर्वीचेच २ फेब्रुवारी रोजीचे ट्वीट व्हायरल होत आहे. यात तिने लिहिले, 'जन्मदिन मुबारक फहात मियॉं! भाई का कॉन्फिडन्स बरकरार रहे, खुश रहो, आबाद रहो..उम्र हो रही है अब शादी कर लो! 

यावर फहादने रिप्लाय देत लिहिले, 'शुक्रिया जर्रानवादी का दोस्त. भाई के कॉन्फिडन्सने तो झंडे गाडे है वो तो बरकरार रहना जरुरी है...और हा, तुमने वादा किया था तुम मेरी शादी मे आओगे तो वक्त निकालो...लडकी मैने ढुंढ ली है.

दोघांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली आहे. 'अरे तुम्ही दोघे तर बहिण भाऊ होते ना' अशी कमेंट एकाने केली आहे. तर 'पहले भाई था अब जान हो गया' असं एकाने म्हणले आहे.

 

Swara Bhasker Marriage : स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात; चार वर्षे लहान सपा नेता फहाद अहमदसोबत केले कोर्ट मॅरेज

लग्नानंतर स्वराने एक व्हिडिओही शेअर केला आहे. दोघांची भेट कशी झाली आणि भेटीचे प्रेमात रुपांतर कसे झाले हे सर्वच त्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. 

टॅग्स :लग्नस्वरा भास्करबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट