२००४ मध्ये रिलीज झालेला 'मैं हूं ना' हा सिनेमा सगळ्यांच्याच लक्षात असेल. त्याकाळी बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या सिनेमातील गाणी, संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. मैं हूं नामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सुद्धा स्क्रीन शेअर केली होती. मात्र, या सिनेमासाठी सुश्मिता ही पहिली पसंती नव्हती.
प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान हिने एका मुलाखतीमध्ये 'मैं हूं ना'विषयी अनेक खुलासे केले. यावेळी बोलत असतांना तिने, 'मैं हूं ना'साठी सुश्मिता पहिली पसंती नसून तिच्याजागी अन्य एका अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचं सांगितलं.
सुश्मिताऐवजी 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती
फराहने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये याविषयी खुलासा केला आहे. फराहच्या युट्यूब व्लॉगमध्ये अभिनेत्री समीरा रेड्डीने हजेरी लावली होती. यावेळी या दोघींच्या संभाषणात फराहने या सिनेमाचे किस्से सांगितले. विशेष म्हणजे 'मैं हूं ना' सिनेमात सुश्मिताऐवजी फराहने अभिनेत्री समीरा रेड्डीची निवड केली होती.
"मी पहिल्यांदा तुला ''आहिस्ता कीजिए बातें'' या म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिलं होतं. या व्हिडीओमध्ये तू इंडियन ट्रेडिशनल लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत होतीस. त्यामुळे तुला पाहून मी तेव्हाच ठरवलं होतं. माझ्या 'मैं हूं ना' मधील चांदणीच्या लूकसाठी तू एकदम परफेक्ट आहेस, असं फराहने सांगितलं. त्यावर, ''अरे देवा..! मग तुम्ही मला विचारलं का नाही?'', असं समीराने म्हटलं.
फराह पुढे म्हणते, "त्यावेळची गोष्ट वेगळी होती. तू 'मैंने दिल तुझको दिया' हा सिनेमा केला होता. त्यामुळे त्यावेळी तुझी इमेज आणि प्रोजेक्ट्स सगळंच बदललं होतं. त्यामुळे मग मी सुश्मिताला ही भूमिका ऑफर केली." दरम्यान, समीराने 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमानंतर 'डरना मना है', 'मुसाफिर', 'नो एंट्री', 'रेस' यांसारखे सिनेमा केला.
Web Summary : Farah Khan revealed Sameera Reddy was her initial choice for 'Main Hoon Na,' but due to Reddy's changed image after 'Maine Dil Tujhko Diya,' the role went to Sushmita Sen.
Web Summary : फराह खान ने खुलासा किया कि 'मैं हूं ना' के लिए समीरा रेड्डी उनकी पहली पसंद थीं, लेकिन 'मैंने दिल तुझको दिया' के बाद रेड्डी की बदली हुई इमेज के कारण, भूमिका सुष्मिता सेन को मिली।