Join us
Daily Top 2Weekly Top 5

तो चिमुकला कोण? मुलगा दत्तक घेतल्याच्या चर्चांवर सुष्मिता सेननं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 12:12 IST

दोन मुलीनंतर Sushmita Senने दत्तक घेतला मुलगा? वाचा काय आहे सत्य

अभिनेत्री सुष्मिता सेन  (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अलीकडे सुष्मिताचं तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झालं. पाठोपाठ काल सुश्मिताचा एका लहान मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला. या फोटोमुळे या फोटोमुळे सुष्मितानं दोन मुलींनंतर तिसरं मूल दत्तक घेतल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता तिने या सर्व चर्चांना पूर्णविरोम दिला आहे.

कालपरवा सुष्मिता सेन तिच्या दोन मुलींसोबत वांद्रे  येथे दिसली होती. यावेळी तिच्यासोबत आणखी एक मूल होतं. ते पाहून सुष्मिताने तिसरे मूल दत्तक घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. आता सुष्मिताने. तिच्या सोशल अकाउंटवर त्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. यात तो मुलगा गाडीच्या बोनटवर बसून सुष्मिता सेनसोबत मस्तपैकी गप्पा मारताना दिसत आहे. पण त्याला सुष्मिताने दत्तक घेतलेलं नाही तर तो तिच्या मित्राचा मुलगा आहे.

‘ माझा गॉडसन एमेडियससोबत मीडियात त्याच्याबद्दल सुरू असलेल्या व्हायरल बातम्यांवर गप्पा मारताना. त्याचा चेहराच सगळं काही सांगतोय...,’असं कॅप्शन सुष्मिताने या फोटोला दिलं आहे. हा फोटो एमेडियसच्या आईने काढला असल्याचा खास उल्लेख तिनं या पोस्टमध्ये केला आहे. यावरून सुष्मिताने या मुलाला दत्तक घेतल्याच्या बातम्या निराधार आहेत, हे स्पष्ट होतंय.

अद्याप अविवाहित असलेल्या सुष्मितानं 200 साली तिची मोठी मुलगी रेनी हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर 2010 साली तिनं अलिशाला दत्तक घेतलं. आपल्या दोन्ही मुलींसोबत सुष्मिताचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्याच्यासोबत व्हिडीओ आणि फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :सुश्मिता सेनबॉलिवूड