Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या फॅमिलीने शेअर केली त्याची एक व्हिडीओ क्लिप, डायलॉग ऐकून व्हाल इमोशनल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 09:13 IST

नुकताच सुशांतच्या फॅमिलीच्या 'यूनायटेड फॉर सुशांत सिंह राजपूत' या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता साधारण ४ महिने झाले आहेत. सुशांतचे फॅन्स अजूनही त्याच्या आठवणी शेअर करताना दिसतात. ते त्याचे व्हिडीओज आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच सुशांतच्या फॅमिलीच्या 'यूनायटेड फॉर सुशांत सिंह राजपूत' या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली.

सुशांतच्या फॅमिलीने शेअर केला व्हिडीओ

ट्विटर अकाऊंटर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सुशांत सिंह राजपूत म्हणत आहे की, 'एक बात बड़ी क्लियर हुई भाईसाहब, प्यार में हिसाब नहीं होता, सीधा राजधानी एक्सप्रेस चलती है'. या व्हिडीओलला कॅप्शन देण्यात आले आहे की, 'त्याने त्याचं मन दिलं पण त्याला दा देण्यात आला'. सुशांतच्या या डायलॉगवर त्याचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. (‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली...’; तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन!!)

यूकेमध्ये कार रॅली

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ति भावाल न्याय मिळवून देण्यासाठी सतत सोशल मीडियावर अॅक्विट राहते. यूकेमधील कार रॅलीचा व्हिडीओ शेअर करत श्वेताने लिहिले की 'यूकेतील ही कार रॅली SSR वॉरिअर्समध्ये एकता दाखवते. आम्हाला सीबीआयवर विश्वास आहे आणि आम्ही आपल्या तपास यंत्रणेकडून सत्य बाहेर आणण्याची वाट बघत आहोत'. (मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न)

14 जूनला झालं होतं सुशांतचं निधन

सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात मृत आढळून आला होता. सुरूवातीला मुंबई पोलिसांनी या केसचा तपास केला. सध्या सुशांतचा केस तपास सीबीआय, ईडी आणि एनसीबी करत आहे. सुशांत केसमध्ये एम्सच्या फॉरेन्सिक टीमने आपला रिपोर्ट सादर केला असून त्यात हत्येची शक्यता नाकारली आहे.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसोशल मीडियासोशल व्हायरल