Sushant Singh Rajput Tattoo : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. छोट्या पडद्यापासून आपल्या करियरला सुरुवात करणाऱ्या सुशांत याने बॉलिवूडमध्ये देखीव स्वतःचं नाव मोठं केलं. काल सुशांतची २१ जानेवारी २०२५ रोजी ३९ वी बर्थ ॲनिव्हर्सरी (Sushant Singh Rajput's Birth Anniversary) होती. सुशांतने या जगाचा निरोप घेतला असला तरी आजही त्याच्या आठवणीने त्याचे चाहते भावूक होतात. प्रेक्षक, चाहते यांच्या मनात सुशांतचं अजूनही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला माहितेय का सुशांतच्या पाठीवर एक टॅटू होता, त्या टॅटूचा अर्थ जाणून घेऊया.
सुशांत सिंग राजपूत त्याच्या आईच्या खूप जवळ होता आणि त्याने खूप लहान वयातच आईला गमावलं होतं. आईला नेहमी जवळ ठेवण्यासाठी त्याने एक खास पद्धत अवलंबली होती. अभिनेत्याने आईच्या आठवणीत पाठीवर टॅटू गोंदवून घेतला होता. त्याची बहीण प्रियंकाने त्याला हा टॅटू काढण्यात मदत केली. सुशांतला असा टॅटू हवा होता, जो तो आणि त्याच्या आईमधील नाते अधिक मजबूत आणि खास बनवेल. त्याने खूप विचार करून एक डिझाइन तयार केले होते. टॅटू बनवल्यानंतर अनेकांना त्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता, ज्याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर सांगितले.
सुशांतच्या पाठीवरील टॅटूमध्ये एक त्रिकोणी वर्तुळ आहे आणि त्याच्या आत दुसरा त्रिकोण आहे. त्यामध्ये आई आणि तिच्या पोटात वाढणारे मूल यांचं चित्र आहे. टॅटूबद्दल सुशांत म्हणाला होता, "या टॅटूमध्ये पाच घटक आहेत, आई आणि मी. तुम्ही हा टॅटू नीट पाहिल्यास, तुम्हाला त्रिकोणाच्या मध्यभागी एक लहान मूल आणि आई देखील दिसेल".
सुशांत याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेता फक्त अभिनयातच नाही तर, अभ्यासात देखील प्रचंड आनंदी होता. त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं. सुशांत याने फक्त तीन वर्ष इंजिनीअरिंगचा अभ्यास केला. त्यानंतर सुशांत याने शिक्षण सोडूवन अभिनयाकडे वाटचाल सुरु केली. एवढंच नाही तर, फिजिक्स नॅशनल ऑलिम्पियाडचा विजेताही होता. त्याने सुमारे 11 अभियांत्रिकीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. सुशांत सर्वसामान्य कुटुंबातील होता. पण त्याची स्वप्न फार मोठी होती.पण सुशांतची अनेक स्वप्न पूर्ण झाली नाहीत. 14 जून 2020 रोजी सुशांत याने वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली होती.