Join us

अखेर सुशांत सिंग राजपूतचा ‘ड्राइव’ येणार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 13:30 IST

सुशांत सिंग राजपूतच्या हातात सध्या अनेक चित्रपट आहेत. पण असेही काही चित्रपट आहेत, ज्याबद्दल संभ्रम आहे. होय,‘रॉ’ या चित्रपटात सुशांत असणार, असे मानले गेले होते. पण ऐनवेळी असे काही झाले की, सुशांतला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इतके कमी की काय म्हणून सुशांतचा ‘ड्राइव’ हा सिनेमाही अडकला.

ठळक मुद्देसुशांतचे म्हणाल तर या नव्या वर्षांत त्याचे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यात पहिला चित्रपट आहे, ‘सोन चिरैय्या’. अभिषेक चौबे दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत दरोडेखोराच्या भूमिकेत आहे. यानंतर ‘किजी और मैनी’, ‘छिछोरे’, ‘चंदा मामा दूर के’ या चित

‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉक्स आॅफिसवर धूम करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतच्या हातात सध्या अनेक चित्रपट आहेत. पण असेही काही चित्रपट आहेत, ज्याबद्दल संभ्रम आहे. होय,‘रॉ’ या चित्रपटात सुशांत असणार, असे मानले गेले होते. पण ऐनवेळी असे काही झाले की, सुशांतला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इतके कमी की काय म्हणून सुशांतचा ‘ड्राइव’ हा सिनेमाही अडकला. करण जोहरच्या या चित्रपटातून सुशांत व जॅकलिन फर्नांडिस जोडी पडद्यावर दिसणार होती. या चित्रपटाचे पोस्टर्सही आऊट झाले होते. इतकेच नाही तर गतवर्षी रिलीज झालेल्या अनुष्का शर्मा स्टारर ‘परी’ या चित्रपटासोबतच ‘ड्राइव’ रिलीज होणार होता. पण अचानक ‘ड्राइव’ला लाल झंडी दाखवण्यात आली. पुढे करणने स्वत:च हा चित्रपट थांबवल्याचे कानावर आले.

होय, करणने ‘ड्राइव’ पाहिला पण त्याला तो अजिबात आवडला नाही. त्यामुळे त्याने याच्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम करण्याचा निर्णय घेतला, असेही ऐकिवात आले. याऊपरही ‘ड्राइव’ थंडबस्त्यात पडला. यानंतर हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही, असे मानले गेले. पण आता नववर्षांत ‘ड्राइव’ थंडबस्त्यातून बाहेर पडला आहे. होय, कदाचित हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होईल, असे कळतेय. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा बाकी आहे.

सुशांतचे म्हणाल तर या नव्या वर्षांत त्याचे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यात पहिला चित्रपट आहे, ‘सोन चिरैय्या’. अभिषेक चौबे दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत दरोडेखोराच्या भूमिकेत आहे. यानंतर ‘किजी और मैनी’, ‘छिछोरे’, ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटांत सुशांत दिसणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकरण जोहरजॅकलिन फर्नांडिस