Join us

'सिम्बा' सिनेमात फॅन्ससाठी सरप्राईज, सिंघम आणि खिलाडीच्या खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:05 IST

सिनेमा रिलीजच्या पूर्वसंध्येला अक्षयने ट्विट करून सिंबाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. आला रे आला 'सिम्बा' आला असं म्हणत त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. सिंबा हिट ठरेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा आगामी 'सिम्बा' सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. हा सिनेमा तिकीटखिडकीवर सुपरहिट ठरणार का याबाबत उत्सुकता आहे. रणवीर सिंह स्टारर हा सिनेमा सुपरहिट ठरावा यासाठी रोहित शेट्टींनी कोणतीही कसर सोडलेली नाही. सिंबामध्ये त्यांनी बड्या स्टार्सना घेऊन ब्लॉकब्लस्टरची तयारी केली आहे. या सिनेमात बॉलीवुडचा सिंघम अजय देवगणची छोटी भूमिका आहे हे ट्रेलर पाहूनच साऱ्यांना कळलं.

 

 

शिवाय या सिनेमात टीम गोलमालसुद्धा पाहायला मिळणार आहे. सिंबामधील मेरावाला डान्स या गाण्यातही अजय देवगण दिसतोय. 'सिम्बा'मध्ये रोहित शेट्टी एक सरप्राईज देणार आहेत. सिंबामध्ये खिलाडी अक्षय कुमारही झळकणार असल्याची चर्चा आहे. सिनेमा रिलीजच्या पूर्वसंध्येला अक्षयने ट्विट करून सिंबाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. आला रे आला 'सिम्बा' आला असं म्हणत त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. सिंबा हिट ठरेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

टॅग्स :अक्षय कुमारसिम्बारणवीर सिंग