Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ना पोटगी, ना कोणता वाद, ना तिसरा व्यक्ती...", अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला सूरज नांबियार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:00 IST

मौनी रॉयसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. त्यावरच आता सूरज नांबियारने मौन सोडत सडेतोड स्पष्टीकरण दिलं आहे.

मनोरंजनविश्वात सध्या मौनी रॉयच्या घटस्फोटाची चर्चा आहे. मौनी आणि बिझनेसमन सूरज नांबियारचा संसार अर्ध्यावरतीच मोडला आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी दोघं घटस्फोट घेत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच मौनीची बेस्ट फ्रेंड दिशा पटानीचं नाव मध्ये येत आहे. अनेकांनी दिशालाच मौनीच्या घटस्फोटाला जबाबदार धरलं आहे. दरम्यान आता सूरज नांबियारने सर्व चर्चांना वैतागून सडेतोड पोस्ट केली आहे. 

सूरज नांबियारने इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट करत लिहिले, "आमच्या विभक्त होण्याबाबत सध्या ज्या काही तथ्यहीन बातम्या येत आहेत, त्या अत्यंत खालच्या थराच्या आणि द्वेषपूर्ण आहेत. मी आता एकदाच काय ते सगळं स्पष्ट करतो. यात कोणतीही पोटगी (Alimony) नाही. कोणताही वाद नाही. तसेच यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा (Third Party) सहभाग नाही. मौनी आणि मी दोघांनी परस्पर सहमतीने आणि एकमेकांचा आदर राखून, एकमेकांच्या चांगल्या भविष्याचा विचार करून, सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हेच सत्य आहे.

बाकी ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या निव्वळ काल्पनिक आहेत. आम्हाला प्रायव्हसी द्या अशी आम्ही विनंती केली आहे पण काही प्रकरणांमध्ये आम्हाला दोघांना केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.  मी पुन्हा हे अगदी स्पष्टपणे आणि शेवटचं सांगतोय की आमच्या दोघांबद्दल किंवा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीबद्दल जे काही दावे केले जात आहेत, त्यात तीळमात्रही तथ्य नाही.

या संपूर्ण प्रकरणात इतर लोकांना ओढणं  अजिबात योग्य नाही. विशेषतः आमच्या त्या निष्पाप मित्रांना ज्यांचा याच्याशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. आम्ही दोघांनीही या कठीण काळात प्रतिष्ठा जपली आहे, आणि मीडियाकडूनही बातमी देताना याच प्रतिष्ठेची आम्ही अपेक्षा करतो.

मीडिया हाऊसेसनी स्वतःच्याच मनाच्या अशा कथा रचल्या आहेत ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. एकाही गोष्टीची शहानिशा न करता या बातम्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत. हा आमच्यावर झालेला अन्यायच आहे.  मी या गोष्टीचा उघडपणे आणि थेट विरोध करत आहे, कारण जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या अशा खोट्या बातम्यांनंतर मी शांत बसणार नाही. आमच्या जॉइंट स्टेटमेंटमध्ये जे सांगायचं होतं ते सर्व आम्ही स्पष्ट केलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्याचा आदर करा आणि आम्हा दोघांनाही शांततेत पुढे जाण्यासाठी आमची  स्पेस द्या."



दुसरीकडे मौनी रॉय आजच विमानतळावर आली असता तिने पापाराझींना टाळलं होतं. तिने घाई असल्याचं सांगत कॅमेऱ्यासमोर पोज दिली नाही आणि ती आतमध्ये गेली. मात्र तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. मौनीने २०२२ साली बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्न केलं. दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्यांनी बंगाली आणि साउथ इंडियन रितींप्रमाणे लग्न केलं होतं. त्याआधी दोघं काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर ४ वर्षातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Suraj Nambiar Denies Alimony, Conflict, or Third Party in Divorce.

Web Summary : Suraj Nambiar refutes rumors of alimony, conflict, or a third party in his divorce from Mouni Roy. He emphasizes a mutual, respectful decision and asks for privacy, condemning false narratives and protecting their friends from unwarranted involvement.
टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूडघटस्फोट