Join us

"माझी पत्नीही माझ्यावर इतका संशय घेत नाही", वरुण धवन असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:56 IST

वरुण धवनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच तो एका ठिकाणी शूटिंगसाठी पोहोचला असता पापाराझींनी त्याला घेराव घातला. यावेळी त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर वरुणने मजेदार उत्तर दिले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पापाराझी वरुणला पाहून  'बिजुरी, बिजुरी' असे मोठ्याने ओरडताना दिसला. तसेच पापाराझींनी, 'वरुण, कुठे जात आहेस?' असा प्रश्न विचारत त्याचा पाठलाग केला. पापाराझींचा हा प्रकार पाहून वरुण हसू लागला आणि म्हणाला, "माझी पत्नीही माझ्यावर इतका संशय घेत नाही!" त्याचे हे मजेदार उत्तर ऐकून सगळेच हसू लागले.

'बिजुरी' हे वरुण धवनच्या आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' मधील नुकतेच प्रदर्शित झालेले गाणे आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल सारखे कलाकारही या चित्रपटात आहेत.

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' व्यतिरिक्त वरुण 'बॉर्डर २' आणि 'है जवानी तो इश्क होना है' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. 'बॉर्डर २' ध्ये दिलजीत दोसांझ आणि सनी देओल हे कलाकारही असतील. तर 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये अभिनेत्री मौनी रॉय त्याच्यासोबत दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूड