Join us

'चिका लोका' म्हणजे आहे तरी काय? पॉर्न स्टार, बॉलिवूड ते आता सनी लिओनीची 'या' क्षेत्रात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:53 IST

सनी लिओनीचा नवीन बिझनेस

सनी लिओनीने (Sunny Leone) अभिनय, मॉडेलिंगनंतर आता आणखी एका क्षेत्रात उडी मारली आहे. तिने दिल्लीतील नोएडामध्ये स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. फूड इंडस्ट्रीत पदार्पण करत तिने नुकतीच रेस्टॉरंटची झलक दाखवली. शिवाय रेस्टॉरंटचं नावही खूपच हटके आहे. तिने सोशल मीडियावर रेस्टॉरंट ओपनिंगचे खास क्षण शेअर केले आहेत. तिच्यासोबत तिचा पती आणि मुलं दिसत आहेत. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

सनी लिओनीने सुरु केलेल्या रेस्टॉरंटचं नाव 'चिका लोका' आहे. हा मूळ स्पॅनिश शब्द आहे. ज्याचा इंग्रजीत अर्थ 'क्रेझी गर्ल' होतो. सोशल मीडियावर या नावाचीही फारच चर्चा आहे. तसंच सनीने तिचे हॉटेलमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तसंच रेस्टॉरंटमधील इंटेरियरही खूप आकर्षक आहे. तसंच व्हिडिओमध्ये सनी स्वत: पिझ्झा बनवताना दिसत आहे. या बिझनेससाठी ती खूपच उत्सुक दिसतीये. 

सनी लिओनीचं हे 'चिका लोका' रेस्टॉरंट नोएडातील सेक्टर 129 येथे आहे. याबद्दल बोलताना सनी म्हणाली, "रेस्टॉरंटशिवायही मला बाकी बरंच काही करायचं आहे. मला वाटतं आपण केवळ एंटरटेनर म्हणून सीमित न राहता बाकीही गोष्टी केल्या पाहिजे. या झोनमधून बाहेरही पडायला हवं. जिथे ब्रँड्सचाही विस्तार करता येईल. मी यापुढेही काही गोष्टींवर काम करणार आहे."

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडहॉटेलनवी दिल्ली