Join us

Animal मधील बॉबीचा लुक पाहून सनी म्हणतो, 'यानंतर कोणताच हिरो व्हिलनसमोर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:57 IST

आपल्या भावाचा हा लुक पाहून सनी देओलने सुद्धा जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये देओल कुटुंब जोरात आहे. धर्मेंद्र, सनी आणि बॉबी तिघांनी अभिनयात जोरदार कमबॅक केलंय. बॉबी देओल (Bobby Deol) आता आगामी 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात बॉबी व्हिलन आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या टीझरमध्ये  त्याचा शर्टलेस फिट लुक पाहून रणबीर नाही तर बॉबीचीच चर्चा जास्त होत आहे. आपल्या भावाचा हा लुक पाहून सनी देओलने (Sunny Deol) सुद्धा जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.

सनी देओल आणि मुलगा राजवीर देओल यांनी नुकत्याच एका मुलाखतीत बॉबी देओलचं कौतुक केलं. जेव्हापासून बॉबीने पुन्हा कमबॅक केलंय तो एकापेक्षा एक हिट प्रोजेक्ट देत आहे. विशेषत: निगेटिव्ह भूमिका त्याला शोभून दिसत आहेत. 'आश्रम'मधली त्याची भूमिता त्यापैकीच एक. तर आता 'अॅनिमल' सिनेमातही तो खलनायक आहे. राजवीरने काका बॉबी देओलचा लुक 'डेडली' असल्याचं म्हटलं आहे. 

तर सनी देओलला बॉबीच्या लुकबद्दल विचारलं असता तो म्हणाला, 'मला असं वाटतं की यानंतर कोणताच हिरो व्हिलनसमोर येऊ शकत नाही.'

बॉबीचा लुक इतका जबरदस्त आहे की हिरोपेक्षा जास्त व्हिलनच भाव खाऊन जातोय. टीझरवर आलेल्या चाहत्यांच्या कमेंट्सही तशाच आहेत. बॉबीचा फिटनेस आणि एकंदर लुक बघून ते चाहते खूश झालेत. संदीप वांगा रेड्डी यांचा 'अॅनिमल' सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. यामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका आहे.

टॅग्स :सनी देओलबॉबी देओलरणबीर कपूर