बॉलिवूड अभिनेता सनी देओल दीर्घकाळापासून बॉक्स ऑफिसवर परतण्याच्या प्रयत्नांत आहे. अर्थात अद्यापही त्याच्या प्रयत्नांना यश मिळू शकलेले नाही. सनी देओल बॉलिवूडचा एक अॅक्शन स्टार म्हणून ओळखला जातो. मधल्या काळात सनीने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केलेत. पण ‘अॅक्शन स्टार’ ही सनीची इमेज पक्की झाल्याने चाहत्यांना त्याचे हे सिनेमे फार पचनी पडले नाहीत. कदाचित सनीने हे हेरले आणि स्वत:साठी एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट निवडला. होय, आम्ही बोलतोय ते सनीचा आगामी चित्रपट ‘ब्लँक’बद्दल.‘ब्लँक’ या सिनेमात सनी पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये सनी पाजी जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय.
Blank Teaser ! सनी देओलचा अॅक्शन अवतार अन् करण कपाडियाचा दमदार डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 13:17 IST
‘ब्लँक’ या सिनेमात सनी पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये सनी पाजी जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय.
Blank Teaser ! सनी देओलचा अॅक्शन अवतार अन् करण कपाडियाचा दमदार डेब्यू!!
ठळक मुद्देकरण हा डिंपल यांची बहीण सिंपल कपाडिया मुलगा आहे. सिंपलच्या मृत्यूनंतर डिंपल यांनीच करणला सांभाळले. त्यामुळे करण डिंपल यांना अगदी आईसारखे मानतो.