सनी देओल, अमीषा पटेल यांच्या करिअरमधील सर्वाधिक ब्लॉकबस्टर सिनेमा कुठला तर तो म्हणजे ‘गदर’. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: धूम केली. १७ कोटी रूपयांत बनून तयार झालेल्या या चित्रपटाने २५६ कोटी रूपयांची अभूतपूर्व कमाई केली. ‘गदर’ने प्रेक्षकांना असे काही वेड लावले होते की, सनी पाजीचा हा चित्रपट पाहण्यासाठी टॅक्टर-ट्रॉलीमधून लोकांचे जत्थेच्या जत्थे चित्रपटगृहांत येत. आम्हाला हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा येऊ घातलेला सीक्वल.
सुरु झाली ‘गदर’च्या सीक्वलची तयारी! लवकरच सुरु होणार शूटींग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:47 IST
होय, ताजी बातमी खरी मानाल तर, ‘गदर’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरु केली आहे.
सुरु झाली ‘गदर’च्या सीक्वलची तयारी! लवकरच सुरु होणार शूटींग!!
ठळक मुद्दे‘गदर’ हा चित्रपट अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता.