Join us

करिश्मा कपूर Ex पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारासाठी दोन्ही मुलांसह दिल्लीत, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:07 IST

संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी करिश्मा कपूर तिच्या दोन्ही मुलांसह दिल्लीला पोहोचली आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिचा एक्स पती संजय कपूर (Sunjay Kapur)  याचे १२ जून रोजी लंडनमध्ये निधन (Sunjay Kapur Death) झाले. पोलो खेळत असताना संजय कपूरला हृदयविकाराचा झटका आला होता. लंडनमध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर संजयचे पार्थिव भारतात आणण्यात आलंय. आज संध्याकाळी ५ वाजता दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी करिश्मा कपूर दिल्लीत पोहचली आहे.

संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी करिश्मा कपूर तिच्या दोन्ही मुलांसह दिल्लीला पोहोचली आहे. यासोबतच करिश्मा कपूरची बहीण करीना कपूर देखील तिचा पती सैफ अली खानसोबत दिल्लीला पोहोचत आहे. दरम्यान, कपूर कुटुंबीयांनी बुधवारी एक अधिकृत निवेदन जारी केलंय. ज्यामध्ये  प्रार्थना सभेची माहिती शेअर करण्यात आली होती. संजय कपूर यांची प्रार्थना सभा रविवार २२ जून रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत नवी दिल्लीतील ५ स्टार हॉटेल ताज पॅलेसमध्ये आयोजित केली जाणार आहे.

संजय कपूर यांचा मृत्यू मधमाशीमुळे?

संजय कपूर पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि त्यांना चावली. त्यानंतर मात्र, त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला. ते पोलो खेळताना मैदानातच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. एका मधमाशीने संजय कपूर यांचा जीव घेतल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

संजय आणि करिश्मा यांचं लग्न किती वर्ष टिकलं?

संजय आणि करिश्मा यांचं २००३ मध्ये लग्न झालं होतं आणि २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.  दोघांच लग्न जवळपास १३ वर्ष टिकलं. करिश्माने २०१४ मध्ये न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि संजयवर अनेक आरोप केले. घटस्फोटादरम्यान, करिश्माने संजयवर तिला मारहाण करण्याचा आणि त्याच्या मित्रांसोबत झोपण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप केला. त्याच वेळी, संजयने आरोप केला होता की अभिनेत्रीने पैशासाठी त्याच्याशी लग्न केलं होतं. करिश्मा आणि संजयचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला असला तरी, त्याने प्रिया सचदेवशी लग्न करून तो आपल्या आयुष्यात पुढे गेला होता. त्याचवेळी, करिश्मा एकटी आई म्हणून तिच्या मुलांचं संगोपन करत आहे.

टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड