Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीवर दु:खाचा डोंगर, संजय कपूर यांच्या निधनानंतर करीनाला अश्रू अनावर, भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:38 IST

संजय कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच करीनाला अश्रू अनावर झाले. करीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि बिझनेसमन संजय कपूर यांचं गुरुवारी(१२ जून) लंडनमध्ये निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. पोलो गेम खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. संजय कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी करिश्मा कपूरचं घर गाठलं. 

करीना कपूरही पती सैफ अली खानसह बहिणीचं सांत्वन करण्यासाठी करिश्माच्या घरी पोहोचली. संजय कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच करीनाला अश्रू अनावर झाले. करीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती करिश्माच्या घरी जाताना गाडीत बसल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत करीना भावुक झाली असून डोळ्यांतील अश्रू पुसताना दिसत आहे. 

संजय कपूर यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि ती त्यांना चावली. आणि त्यामुळे संजय कपूर यांना श्वास घेण्यास अडचण झाली. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली, असंही कारण समोर आलेलं आहे.

संजय कपूर यांनी २००३ साली अभिनेत्री करिष्मा कपूरशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही झाला. मात्र लग्नानंतर १३ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. करिष्माने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. करिष्माशी घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी दुसरं लग्न केलं. 

टॅग्स :करिश्मा कपूरकरिना कपूर