Join us

"मला या गोष्टीची भीती...", गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता यांची होती 'अशी' प्रतिक्रिया; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:31 IST

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते.

Govinda Wife Sunia Ahuja Reaction: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. ९० च्या दशकात अभिनेत्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'हीरो नंबर १', 'साजन चले ससुराल','राजा बाबू', 'बडे मियाँ छोटे मिया' असे सुपरहिट सिनेमे गोविंदाच्या नावावर आहेत. दरम्यान, अभिनेत्याची डान्सची स्टाईल, विनोद करण्याची शैली, टायमिंग व अभिनय यांमुळे त्या काळातील तो लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होता. गोविंदा यांच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. या प्रकरणामुळे तो चांगलाच चर्चेत होता. दरम्यान, या घटनेवर अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

अलिकडेच सुनीता अहुजा यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला मुलाखत दिली. याबद्दल सांगताना सुनीता यांनी म्हटलं, की कोणत्याही परिस्थितीत मी गोंधळून जात नाही. जेव्हा मला गोविंदाला गोळी लागली हे समजलं तेव्हा देखील मी नॉर्मल वागत होते. दरम्यान, या मुलाखतीमध्ये सुनीता अहुजा म्हणाल्या, "त्यावेळी माझ्या ड्रायव्हरने फोन करुन मला सांगितलं की साहेबांना गोळी लागली आहे. मग मी त्याला म्हटलं लागली की कोणी मारली. तेव्हा त्याने सांगितलं की नाही, ते बंदुक ठेवत असताना ती खाली पडली. त्यानंतर गोविंदासोबत माझं बोलणं झालं. त्यावेळी त्याने मला सांगितलं की गोळी लागली आहे. मग मी त्याला म्हणाले, तू स्वत: तर गोळी मारून घेतली नाहीस ना. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, तूला अजूनही विनोद सूचत आहेत. मग मी त्याला शांत होण्यास सांगितलं. कारण मला या गोष्टीची भीती वाटत होती की त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो."

पुढे त्या म्हणाल्या, "त्यानंतर मी घरी माझी मुलगी टीनाला फोन केला. तिला सांगितलं की तू घाबरुन जाऊ नकोस, त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. असं सांगितलं. मी कधीच कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून जात नाही."

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडसेलिब्रिटी