Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितसोबत होळीच्या शुभेच्छा देताना सुनील शेट्टींनी केली मोठी गडबड! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 11:02 IST

सुनील शेट्टींनी हॅपी होळीच्या ऐवजी सर्वांना वेगळ्याच शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सर्वांची हसून हसून पुरेवाट लागली.

सगळीकडे होळी - रंगपंचमीचा माहोल सुरु आहे. एकमेकांना रंग लावण्यात सगळेच व्यस्त असून होळी - रंगपंचमीचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टींनी होळीच्या शुभेच्छा देताना एक मोठी गडबड केलेली दिसली. सुनील शेट्टी कायम डॅशिंग मूडमध्ये चाहत्यांशी संवाद साधत असतात. सुनील शेट्टींचा अनोखा अंदाज कायमच सर्वांच्या पसंतीस उतरत असतो.  सुनील शेट्टींनी होळीच्या शुभेच्छा देताना काय गडबड केली? बघा

झालं असं की, विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी आणि भारती सिंग डान्स दिवाने सीझन 4 च्या होळी स्पेशल एपिसोडच्या शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये पोहोचलेले दिसत आहेत. सुनील शेट्टी माधुरी दीक्षितसोबत पोज देत असताना सुनील यांनी पापाराझींना होळीऐवजी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सुनील यांच्या तोंडून 'हॅपी दिवाली' बाहेर पडताच सगळे जोरजोरात हसू लागले.

सुनील शेट्टींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते सध्या अक्षय कुमारसोबत दोन सिनेमे करत आहेत. त्यातला एक सिनेमा म्हणजे 'हेरा फेरी  3' आणि दुसरा सिनेमा म्हणजे 'वेलकम टू जंगल' अर्थात 'वेलकम 3'. या दोन्ही सिनेमांचं शुटींग सध्या सुरु असून सुनील शेट्टींना बऱ्यात कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर बघायला सगळेच उत्सुक आहेत.

टॅग्स :सुनील शेट्टीअक्षय कुमारमाधुरी दिक्षित