होळीचा सण संपला. कोरोनाचे सावट असूनही देशभर उत्साहात होळी साजरी झाली. बॉलिवूडकरांनीही रंगांचा हा सण दणक्यात साजरा केला. सोबतच चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्यात. अशात बॉलिवूड अभिनेता व कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) याने असे काही ट्विट केले की तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.होय, होळी संपून दोन दिवस उलटल्यावर सुनील ग्रोव्हरने होळीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली. (Sunil Grover's Belated Holi Wish) काल 31 मार्चला Happy holi guys असे ट्विट त्याने केले.
सुनील भाई, इतक्या लवकर होळीच्या शुभेच्छा दिल्यात, अशा उपरोधिक शब्दांत काहींनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अन्य एका युजर्सने, कोणत्या जगात वावरतो आहेस? असा सवाल त्याला केला.
सुनील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे कॉमेडी व्हिडीओ, फोटो चाहत्यांसह तो शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचा विनोदी अंदाज पाहता येतो. आॅनस्क्रीन असो या आॅफस्क्रीन सुनील ग्रोव्हर नेहमीच मजेशीर अंदाजात राहणे पसंत करतो. रसिकांना खळखळून हसवत असतो. त्यामुळे आज लाखोंच्या संख्येत सुनील ग्रोव्हरचे चाहते जगभरात पसरले आहेत.छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही सुनीलने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सुनिल आपल्या हटके मेजशीर अंदाजाने लक्ष वेधून घेत असतो.