Join us

सुनील ग्रोव्हरवर का आली हार्ट सर्जरीची वेळ? आजारी असूनही आधी संपवलं शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:48 IST

Sunil Grover Heart Surgery: कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर याच्यावर नुकतीच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. टीव्ही अभिनेत्री व होस्ट सिमी ग्रेवालने ट्विट करत, ही शॉकिंग बातमी शेअर केली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Sunil Grover Heart Surgery:  कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर  (Sunil Grover) याच्यावर नुकतीच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. टीव्ही अभिनेत्री व होस्ट सिमी ग्रेवालने ट्विट करत, ही शॉकिंग बातमी शेअर केली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. पडद्यावर सतत लोकांना हसवणारा सुनील ग्रोव्हर आतून आजारी होता, याची भणकही कुणाला लागली नव्हती. किंबहुना सुनीलने ती लागू दिली नाही. त्यामुळे त्याच्या हार्ट सर्जरीची बातमी ऐकून चाहत्यांची चिंता वाढली. सुनीलला नेमकं काय झालं? सर्जरीची वेळ का आली? याचा खुलासाही आताश: झाला आहे.

न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुनीलच्या हृदयात ब्लॉकेज आढळले होते. वेळेत सर्जरी झाली नसती तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला तातडीने सर्जरी करण्याचा सल्ला दिला आणि त्यानुसार ही सर्जरी पार पडली.सर्जरीआधी सुनील त्याच्या आगामी सीरिजच्या शूटींगमध्ये बिझी होता. सूत्रांनी सांगितल्यानुसार, प्रकृती बरी नसूनही सुनीलने पुण्यात त्याच्या आगामी सीरिजचं शूटींग र्पू केलं. हृदयात ब्लॉकेज असल्याचं त्याला कळलं होतं. पण आधी त्याने कमिटमेंट पूर्ण करत शूटींग संपवलं आणि यानंतर कुठलाही बोभाटा न करता उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाला. अद्याप सुनीलने त्याच्या आजाराबद्दल अधिकृतरित्या काहीही माहिती दिलेली नाही.

सुनील याआधी झी5 वर रिलीज ‘सनफ्लावर’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता. त्याआधी सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमात तो दिसला होता. सुनील ग्रोव्हरला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोनं अमाप  प्रसिद्धी मिळवून दिली. त्याने आजवर भरपूर भूमिका साकारल्या पण त्याची गाजलेली भूमिका म्हणजे ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ मधील ह्यगुत्थी आणि रिंकु भाभीची. आपल्या कॉमेडी टाइमिंगमुळे त्याने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकलीत. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

टॅग्स :सुनील ग्रोव्हर