Join us

'हेरा फेरी ३'मध्ये परेश रावल यांची एन्ट्री, सुनील शेट्टीने केला खुलासा "ते परत आले, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:05 IST

'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडलेले परेश रावल पुन्हा टीममध्ये! का आले परत?

Hera Pheri 3: 'हेरा फेरी ३' या बहुप्रतीक्षित चित्रपटात अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) पुन्हा एकदा बाबूरावच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.  यामुळे चाहते आणि निर्माते दोघेही सुखावले आहेत. काही महिन्यांपूर्वी परेश रावल यांनी अचानकपणे या प्रकल्पातून माघार घेतल्याने चाहते निराश झाले होते. एवढेच नाही तर अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar) 'केप ऑफ गुड फिल्म्स' कंपनीने त्याच्याविरोधात तब्बल २५ कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता. या संपूर्ण वादानंतर परेश पुन्हा एकदा 'हेरा फेरी ३'मध्ये सहभागी (Paresh Rawal Comeback In Hera Pheri 3) झालेत.  या नाट्यपूर्ण घडामोडींविषयी अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

सुनील शेट्टी सध्या आपल्या 'द हंटर २'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.  याच दरम्यान 'हेरा फेरी ३'मध्ये परेश रावल यांच्या कमबॅकवर तो म्हणाला, "या दोघांमध्ये समेट होणं शक्य झालं. कारण परेश हे  अक्षयचा खूप आदर करतात आणि अक्षयही परेश यांचा मान ठेवतो".

पुढे तो म्हणाला, "परेश हे कधीही अक्षयविरोधात काहीही बोलले नाहीत. तसेच जेव्हा पत्रकाराने त्यांच्याविरुद्ध परेश यांच्याविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अक्षयने त्याला थांबवत म्हटलं, 'अशी भाषा वापरू नका' त्या दिवशी आम्हाला समजलं की हे दोघं खरे मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीमध्ये तिसऱ्याला वाव नाही". या पॅचअपमध्ये अहमद खान आणि साजिद नाडियाडवाला यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, अशी माहितीही पुढे आली आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, या दोघांनीच दोन्ही बाजूंमधील गैरसमज मिटवून मैत्रीचा धागा पुन्हा जोडला आहे. 

परेश रावल यांनी अचानकपणे चित्रपटातून माघार घेतल्याने निर्माते आणि कलाकारांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, आता सर्व वाद मिटले असून परेश लवकरच चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे. निर्मात्यांचा उद्देश 'हेरा फेरी ३' हा पुढील वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित करण्याचा आहे. 'हेरा फेरी'सारख्या कल्ट कॉमेडी मालिकेचा हा तिसरा भाग असून बाबूराव गणपतराव आपटेच्या भूमिकेत परेश रावल यांचं कमबॅक चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बाब ठरली आहे.

टॅग्स :सुनील शेट्टीअक्षय कुमारपरेश रावल