'बॉर्डर २' सिनेमाची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. सनी देओल, अहान शेट्टी, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ अशी सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. अहान शेट्टी हा सुनील शेट्टीचा मुलगा आहे. सोशल मीडियावर अहान शेट्टीने रीलवर कमेंट करावी असा ट्रेंडच सुरु आहे. अहानच्या करिअरसाठीही हा सिनेमा खूप महत्वाचा आहे. मधल्या काळाच अहान रिलेशनशिपमुळेही चर्चेत आला होता. नंतर त्याचं गर्लफ्रेंडसोबत नातं तुटलं. आता नुकतंच सुनील शेट्टीने त्याचा लेक वैयक्तिक आयुष्यात कसा आहे याचा खुलासा केला.
झूमशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, "अहान वैयक्तिक आयुष्यात शांत स्वभावाचा आहे. तो खूप खरा आहे. मी म्हणेन जरा जास्तच खरा आहे. त्याचा दमदार आवाज आहे. व्यक्तिमत्व कमाल आहे. तो खूप विचारपूर्वक स्क्रीप्ट्स आमि सिनेमे निवडतो. मी जरा भावनावश आहे. थोडा जास्त भावनिक आहे आणि तो तर माझ्यापेक्षा खूप जास्त हँडसम आहे. माझ्याहून जास्त विनम्र आहे. त्याला आम्ही घरी 'जेन बॉय' बोलतो. त्याचा माइंडसेट तसाच आहे. तो नेहमी शांत असतो अजिबात घाबरत नाही. याचं कदाचित कारण हे असेल की तो सिंगल आहे. एकदा का तो बाप बनला की गोष्टी बदलतील. जेव्हा लग्न होतं आणि मुलं होतात तेव्हा आयुष्यात सगळं काही बदलतं."
बॉर्डर २ साईन केल्याने अहानला इतर काही संधी गमवाव्या लागल्या. त्याला काही सिनेमांमधून काढून टाकण्यात आलं आणि उलट त्यालाच यासाठी दोषीही ठरवण्यात आलं. तो महागडे बॉडीगार्ड्स घेतो अशा अफवा पसरवण्यात आल्या. पेड आर्टिकल्स छापले गेले."
सुनील शेट्टीने बोलता बोलता अहान सिंगल असल्याचा खुलासा केला. मधल्या काळात अहान आणि तान्या श्रॉफ यांचं अफेअरर चर्चेत होतं. दोघं लहानपणीचे मित्र होते आणि ११ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २०२३ साली त्यांचं नातं तुटलं.
Web Summary : Sunil Shetty revealed Ahan's calm nature and single status during Border 2 promotions. Ahan lost opportunities, faced rumors after signing the film. He was previously in a long-term relationship that ended in 2023.
Web Summary : सुनील शेट्टी ने 'बॉर्डर 2' के प्रमोशन के दौरान अहान के शांत स्वभाव और सिंगल होने का खुलासा किया। अहान को फिल्म साइन करने के बाद मौके गंवाने पड़े और अफवाहों का सामना करना पड़ा। वह पहले एक लंबे रिश्ते में थे, जो 2023 में खत्म हो गया।