Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suniel Shetty : 'ये हाथ मुझे दे दे ठाकुर', सुनील शेट्टीची द ग्रेट खली सोबत मस्ती; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:01 IST

अभिनेता सुनील शेट्टीने अभिनयानंतर आता सूत्रसंचालनातही पाऊल ठेवले आहे.

Suniel Shetty : अभिनेता सुनील शेट्टीने अभिनयानंतर आता सूत्रसंचालनातही पाऊल ठेवले आहे. भारताचा पहिलाच एमएमए रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी बॉलिवूडचा अण्णा सज्ज आहे. एमएक्स प्लेयरवर 'कुमाइट १ वॉरियर हंट' हा शो सुरु होतोय. शोचा लॉंचिंग कार्यक्रम आज पार पडला. यासाठी सुनील शेट्टी सोबतच महावीर फोगाट आणि द ग्रेट खली यांनी देखील हजेरी लावली.

एमएमए लॉंच वेळी द ग्रेट खली आणि सुनील शेट्टीचा मस्ती बघायला मिळाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 'खली'चा हात वर उचलत सुनील शेट्टी म्हणतो, 'ये हाथ मुझे दे दे ठाकुर. खली सरांना आमच्या उंचीचे दिसायला झोपावंच लागेल.'

सुनील शेट्टीचा हा मस्ती मूड उपस्थित असलेल्या सर्वांनीच एंजॉय केला. नुकतेच सुनीलची लेक अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकली.  खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया आणि के एल राहुल यांचा विवाहसोहळा पार पडला. लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टी पुन्हा कामावर परतला आहे.

टॅग्स :सुनील शेट्टीद ग्रेट खलीसोशल मीडिया