Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापाला लेकाचं कौतुक! 'बॉर्डर २' मध्ये अहानला पाहून भावुक झाला सुनील शेट्टी, म्हणाला- "तुला त्याच गणवेशात पाहणं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:07 IST

Border 2: लेकाचा चित्रपट प्रदर्शित होताच सुनील शेट्टी झाला भावुक, शेअर केली पोस्ट, म्हणाला...

Suniel Shetty Post About Border 2: अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर-२' (Border 2)  हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या बॉर्डर सिनेमाचा हा सीक्वल आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याला सिनेरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सोशल मीडियासह चाहत्यांकडून सनी देओल आणि संपूर्ण स्टारकास्टच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.याचदरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा मुलगा अहान शेट्टीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून चाहते देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.

अभिनेता सुनील शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये  'बॉर्डर २' चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या मुलाच्या भूमिकेचं कौतुक केलंय आणि अहानवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.सुनील शेट्टीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 'बॉर्डर' आणि 'बॉर्डर २' चित्रपटातील काही अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत." प्रिय अहान, आज मी तुला सांगू इच्छितो की माझ्यासाठी 'बॉर्डर' हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर ती एक जबाबदारी होती. आजही मी ती प्रतिमा माझ्या मनात जिवंत ठेवली. इतक्या वर्षांनी तुला त्या भूमिकेत पाहून ती भावना पुन्हा जिवंत झाली आहे. "

अभिनेत्याने मग पुढे लिहिलंय, "हा चित्रपट केवळ अभिमान किंवा युद्धाबद्दलच बोलत नाही तर शांतता किती महत्त्वाची आहे आणि त्याची किंमत काय आहे याची जाणीव करून देतो. बॉर्डर फक्त अशी जागा नाही जिथे देशाची सीमा संपते. तर तिथे साहसाची कहाणी सुरु होते. काही कथा फक्त पडद्यावर राहत नाहीत, तर त्या देशातील लोकांच्या हृदयात घर करतात.आपण या वर्दीचं महत्त्व कधीही विसरता कामा नये.जय हिंद, जय भारत...", अशी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. 

'बॉर्डर २'  हा सिनेमा १९९७ च्या क्लासिक चित्रपट बॉर्डरचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलसोबत दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. बॉर्डर २ मध्ये मोना सिंग, मेधा राणा, सोनम बाजवा आणि अन्या सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty emotional seeing Ahan in 'Border 2' uniform.

Web Summary : Suniel Shetty shared an emotional post praising his son Ahan Shetty's role in 'Border 2'. He reminisced about the original 'Border' and highlighted the importance of peace, pride, and sacrifice depicted in the film. The movie features Sunny Deol, Diljit Dosanjh, and Varun Dhawan.
टॅग्स :सुनील शेट्टीसीमारेषासिनेमाबॉलिवूड