Join us

सुनील शेट्टीनं खरेदी केली नवी कोरी Land Rover Defender 110 SUV, जाणून घ्या किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:03 IST

Suniel Shetty : मोजक्याच सिनेमा दिसत असूनही अण्णा अलिशान आयुष्य जगतोय.  ‘बॉलिवूडचा अंबानी’ म्हणून ओळखला जाणारा हा शेठ अरबपती आहे. आता अण्णांनं नवी कोरी कार घेतली आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. 

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी (Suniel Shetty) हल्ली मोजक्याच सिनेमात दिसतो. ना हिरोसारखा चेहरा, ना हिरोसारखा डान्स तरीही सुनील शेट्टीनं एक काळ गाजवला आणि आज मोजक्याच सिनेमा दिसत असूनही अण्णा अलिशान आयुष्य जगतोय.  ‘बॉलिवूडचा अंबानी’ म्हणून ओळखला जाणारा हा शेठ अरबपती आहे. आता अण्णांनं नवी कोरी कार घेतली आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. 

सुनील शेट्टीकडे एकापेक्षा एक महागड्या व अलिशान गाड्या आहेत. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. सुनील शेट्टीने अलीकडेच लँड रोव्हर डिफेंडर 110 एसयूव्ही खरेदी केली आहे. ही एक अतिशय शक्तिशाली ऑफ-रोड एसयूव्ही आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.5 कोटींहून अधिक आहे.

 अभिनेता सनी देओल, अर्जुन कपूर, मामूट्टी, पृथ्वीराज, रवी तेजा आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या अनेक नेत्यांसह देशातील अशाच काही सेलिब्रिटींकडे ही कार आहे.  

सुनील शेट्टीकडे Mercedes-Benz GLS 350, Mercedes-Benz G350D, Hummer H2, Jeep Wrangler,  BMWX5 अशा अनेक अलिशान गाड्या आहेत.  

सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, लवकरच त्याची ‘धारावी बँक’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी थीम असलेल्या या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. या सीरिजच्या माध्यमातून अण्णा ओटीटीवर पदार्पण करतोय. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा थलाईवन हे पात्र त्याने साकारलं आहे. यात विवेक ओबेरॉय एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, चिन्मय मांडलेकर असे मराठमोळे चेहरेही यात आहे.  येत्या 19 नोव्हेंबरला ही सीरिज एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणार आहे.

टॅग्स :सुनील शेट्टीबॉलिवूड