Join us
Daily Top 2Weekly Top 5

दु:खद!! ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या सूफी गायकाचा अखेर मृतदेहच सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:02 IST

काही दिवसांपूर्वी काही मित्रांसोबत धर्मशाळेत आले होते. सोमवारी ते धर्मशाला येथून कारेरीला गेले होते.

ठळक मुद्देमनमीत यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनमीत पंजाबच्या अमृतसरचे राहणारे होते.

धर्मशाळा येथे ढगफुटीनंतर बेपत्ता झालेले सुफी सिंगर मनमीत सिंग यांचा (Sufi Singer Manmeet Singh)अखेर मृतदेह सापडला आहे. मनमीत यांच्या अशा अकाली निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुफी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगीत बंधू तसेच सैन बंधूंपैकी एक गायक मनमीत सिंग होते. मनमीत सिंग हे भाऊ कर्णपाल व आपल्या काही मित्रांसोबत शनिवारी धर्मशाळा येथे पोहोचले होते.

रविवारी सकाळी सर्वजण धर्मशाळा येथून करेरी फिरण्यासाठी निघाले होते. रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला आणि रात्री या सर्वांनी तिथेच मुक्काम ठोकला. सोमवारी सकाळी परतत असताना एक खड्डा पार करत असताना मनमीत पाण्यात वाहून गेले. भाऊ आणि मित्रांनी मनमीत यांना शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला. पण त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. यानंतर त्यांना शोधण्यासाठी एका रेस्क्यू टीम गठीत करण्यात आली आणि मंगळवारी रात्री उशीरा मनमीत यांचा मृतदेहच सापडला.मनमीत यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनमीत पंजाबच्या अमृतसरचे राहणारे होते. ‘दुनियादारी’ या गाण्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती.

टॅग्स :बॉलिवूड