Join us

प्रीती झिंटाला आजही माफ करु शकली नाही सुचित्रा कृष्णमूर्ती, शेखर कपूरसोबच्या घटस्फोटासाठी ठरवलं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 18:08 IST

आपला संसार मोडण्यासाठी सुचित्रा प्रिती झिंटाला कारणीभूत मानते. यासाठी तिने आजपर्यंत प्रितीला माफ केलेले नाही.

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) सध्या चर्चेत आली आहे. तिने  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखत अनेक खुलासे केले. या मुलाखतीमध्ये तिने शेखर कपूरवर गंभीर आरोप केले आहेत. ती आजही आपला संसार मोडण्यासाठी प्रिती झिंटाला कारणीभूत मानते. यासाठी तिने आजपर्यंत प्रितीला माफ केलेले नाही. 

सुचित्राने बॉलिवूड ठिकानाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रीति झिंट्याच्या एका त्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुचित्राने २००० साली सरळसरळ प्रितीमुळे आपला संसार मोडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी प्रीतीनं म्हटलं होतं की, मी टॉपची अभिनेत्री आहे आणि तू तर कामही करत नाही. गृहिणी आहेस, तू माझ्याशी असं बोलू नकोस. एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घे. असा सल्ला प्रीतिनं सुचित्राला दिला होता. सुचित्रानं आता प्रीतीच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुचित्रा म्हणाली, मला यावर काही बोलायचं नाही. हे एक स्वतंत्र जग आहे आणि तुम्ही काहीही बोलू शकता. मला गृहिणी असल्याचा खूप अभिमान आहे. मी 20 वर्षांपासून पूर्णवेळ आई आहे आणि मला याचा अभिमान आहे.  लोकांना जे काही बोलायचे आहे ते बोलू शकतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुचित्रानं सांगितलं होतं की, मी अजूनपर्यत तिला माफ केलेलं नाही. ती माझ्यासाठी कुणीही नाही.

दरम्यान, सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी वयाच्या २२ व्या वर्षी शेखर कपूरसोबत लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.१२ वर्ष संसार केल्यानंतर निर्माता शेखर कपूर यांना घटस्फोट दिला आहे. १९९९ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाले. घरातल्यांचा विरोध असतानाही शेखरसोबत लग्न केल्याचा पश्चाताप होत असल्याचं तिने म्हटलं आहे.

 

टॅग्स :प्रीती झिंटा