भारतामधील प्रेक्षकांचे सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन प्लॅटफॉर्म असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल अॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘सुभेदार’च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली. हा चित्रपट 5 मार्च रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे. मुख्य म्हणजे ९० च्या दशकात ज्या अनिल कपूर यांना आपण अँग्री यंग मॅन अवतारात पाहिलं. त्याच अवतारात अनिल कपूर या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहेत.
‘सुभेदार’ मध्ये निवृत्त पोलील अधिकारी अर्जुन मौर्य यांच्या आयुष्यातील चढ-उतारांनी भरलेला प्रवास दाखवण्यात आला आहे. बदलत्या जगात शांतता आणि सन्मान शोधताना त्याच्या आयुष्यभर जपलेल्या मुल्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. अनिल कपूर यांनी या भूमिकेत प्रभावी अभिनय साकारला असून ते गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसतात. त्याचबरोबर तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आणि नेहमी योग्य गोष्टीची साथ देण्याचा त्यांचा निर्धार चित्रपटात ठळकपणे मांडला आहे.
'तुम्हारी सुलु’, ‘जलसा’ आणि ‘दलदल’ सारख्या उत्कृष्ट कथांमुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी ‘सुभेदार’चे दिग्दर्शन केले असून विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ओपनिंग इमेज फिल्म्स निर्मित आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क (AKFCN) यांच्या सहकार्याने साकारलेला हा चित्रपट दमदार आणि भावनांनी परिपूर्ण अॅक्शन-ड्रामा आहे.
या चित्रपटाची कथा सुरेश त्रिवेणी आणि प्रज्वल चंद्रशेखर यांनी लिहिली आहे. यात अनिल कपूर आणि राधिका मदान मुख्य भूमिकेत झळकणार असून सौरभ शुक्ला, आदित्य रावल, फैजल मलिक आणि मोना सिंह यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सुभेदार’चा प्रीमियर ५ मार्च रोजी प्राईम व्हिडीओवर होणार आहे.
Web Summary : Anil Kapoor stars in 'Subedaar' as a retired police officer battling crime and corruption. Premiering March 5th on Prime Video, the film explores his struggle to uphold values while reuniting his family. Radhika Madan also stars.
Web Summary : अनिल कपूर 'सूबेदार' में एक सेवानिवृत्त पुलिस अधिकारी की भूमिका में हैं, जो अपराध और भ्रष्टाचार से लड़ रहे हैं। 5 मार्च को प्राइम वीडियो पर प्रीमियर होने वाली यह फिल्म उनके मूल्यों को बनाए रखने और अपने परिवार को फिर से मिलाने के संघर्ष को दर्शाती है। राधिका मदान भी हैं।