Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert!!  हे आहे बॉलिवूडचे आजपर्यंतचे सर्वात बोल्ड सॉन्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 12:01 IST

बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेही हिच्या आयटम सॉन्गने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.

ठळक मुद्दे‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे

बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेही हिच्या आयटम सॉन्गने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. अलीकडे बॉलिवूडचे बहुतांश सिनेमे नोरा फतेहीच्या आयटम सॉन्गशिवाय पूर्ण होत नाहीत. आता आणखी एका सिनेमात नोराच्या कातिल अदा पाहायला मिळणार आहेत. होय, वरूण धवनश्रद्धा कपूर स्टारर ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सिनेमात नोरा थिरकताना दिसणार आहे. अलीकडे ‘गर्मी सॉन्ग’ रिलीज झाले आणि या गाण्याने जणू आग लावली. होय, कारण बॉलिवूडमधील हे गाणे आत्तापर्यंतचे सगळ्यांत बोल्ड गाणे आहे. हे गाणे इतके बोल्ड आणि इंटेन्स आहे की, गाण्याच्या सुरुवातीलाच स्क्रिनवर ‘सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है कि उसे नजरअंदाज करना मुश्किल है’ अशी सूचना देण्यात आली आहे.

या गाण्यात नोरा फतेही आणि वरुण धवन यांच्या किलर डान्स मूव्ह पाहायला मिळत आहे. नोराने दिलेला बोल्डनेसचा तडका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात नोराने केवळ आयटम नंबर केलेले नाही तर ती यात अभिनय करतानाही दिसणार आहे. 

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मधील हे गर्मी सॉन्ग नेहा कक्कर आणि बादशाह यांनी गायले आहे. साहजिकच या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासांत या गाण्याला लाखो व्ह्यूव्ह मिळाले यावरून याचा अंदाज यावा.

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. टी सीरिजची निर्मिती असलेला हा सिनेमा रेमो डिसूझाने दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा याआधी आलेल्या ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी 2’चा सीक्वल आहे.

टॅग्स :नोरा फतेहीवरूण धवनश्रद्धा कपूर