Join us

म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 14:45 IST

राजकुमार राव प्रत्येक शुक्रवारी काही न खाता उपवास करतो? यामागील कारण जाणून घ्या (rajkumar rao)

राजकुमार राव हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. राजकुमारला आपण विविध सिनेमांमधून अभिनयक्षेत्रात स्वतःची ओळख मिळवताना पाहिलंय. राजकुमार रावने २०२४ चं वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलंय. आधी 'श्रीकांत' नंतर 'स्त्री २' आणि सध्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' अशा सिनेमांमधून राजकुमारने स्वतःची छाप पाडली आहे. राजकुमार राव आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी उपवास करतो. काय आहे यामागचं कारण? याचा खुलासा त्याने केलाय.

म्हणून राजकुमार दर शुक्रवारी ठेवतो उपवास

राजकुमारने नुकतंच समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. राजकुमार सांगतो की तो अनेकदा देवाची पूजा करतो. श्रीकृष्णाबद्दल त्याला विशेष भक्ती आहे. राजकुमारच्या घराशेजारी संतोषी मातेचं मंदिर होतं. तेव्हा मुलगा व्हावा म्हणून राजकुमारच्या आईने देवीची आराधना केली होती. पुढे योगायोगाने शुक्रवारी राजकुमारचा जन्म झाला. त्यामुळे वयाच्या १६-१७ व्या वर्षी जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून राजकुमार दर शुक्रवारी काहीही न खाता उपवास करतो. 

राजकुमार रावचं वर्कफ्रंट

राजकुमार राव हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. राजकुमारला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. राजकुमार रावने LSD सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. नंतर 'गँग ऑफ वासेपूर', 'काय पो चे' पासून नुकताच रिलीज झालेला 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' सिनेमापर्यंत राजकुमार रावच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. राजकुमारच्या आगामी सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :राजकुमार रावबॉलिवूडनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४