दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि 'ॲनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' (Spirit) या चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा आहे. या चित्रपटाबाबत आता एक अतिशय मोठी अपडेट समोर आले आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी प्रभासच्या विरोधात खलनायक म्हणून एका अशा अभिनेत्याला कास्ट करण्याची तयारी केली आहे, ज्याच्यासोबत प्रभासची २२ वर्षांपूर्वीची मोठ्या पडद्यावरील जुनी दुश्मनी पुन्हा जिवंत होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'स्पिरिट'मध्ये प्रभासच्या विरोधात तेलुगू चित्रपटसृष्टीतील 'माचो स्टार' गोपीचंद हा विलनच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २००४ मध्ये आलेल्या सुपरहिट 'वर्षम' चित्रपटात प्रभास आणि गोपीचंद एकमेकांविरुद्ध भिडले होते. त्या चित्रपटात गोपीचंदने साकारलेली 'भद्रा' ही विलनची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता २२ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोंगटे उभे करणारा थरार घेऊन येणार आहे.
संदीप रेड्डी वांगा हे आपल्या चित्रपटातील पात्रांना अतिशय हिंसक आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. 'अर्जुन रेड्डी' आणि 'ॲनिमल'नंतर आता 'स्पिरिट'मध्ये ते प्रभासला एका प्रामाणिक पण तितक्याच रागीट पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दाखवणार आहेत. अशा शक्तिशाली हिरोसमोर तितकाच तगडा विलन असावा, यासाठी त्यांनी गोपीचंदची निवड केल्याचे बोलले जात आहे.
'स्पिरिट'मध्ये केवळ गोपीचंदच नाही, तर विवेक ओबेरॉय, काजोल आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल डेहराडूनमध्ये पार पडणार आहे. तसेच, नुकताच या चित्रपटातील प्रभासचा पहिला लूक समोर आला होता, ज्यामध्ये तो तृप्ती डिमरीसोबत दिसला होता. 'स्पिरिट' हा चित्रपट ५ मार्च २०२७ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी आधीच जाहीर केले आहे. प्रभास आणि गोपीचंद यांच्यातील मोठ्या पडद्यावरील ही 'दुसरी लढाई' पाहण्यासाठी चाहते आतापासूनच प्रचंड उत्सुक आहेत.
Web Summary : Prabhas and Gopichand, who starred in 'Varsham' 22 years ago, will reunite in 'Spirit'. Gopichand is likely to play the villain opposite Prabhas, a cop. The movie releases March 5, 2027.
Web Summary : 'वर्षम' में साथ काम करने के 22 साल बाद प्रभास और गोपीचंद 'स्पिरिट' में फिर से साथ दिखेंगे। गोपीचंद, प्रभास के विपरीत खलनायक की भूमिका निभा सकते हैं। फिल्म 5 मार्च, 2027 को रिलीज होगी।