Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरात अंकिता-विकीला खास सुविधा; इतर सदस्य संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 19:57 IST

आता 'बिग बॉस १७'चा नवा प्रोमो समोर आला आहे. 

'बिग बॉस १७' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना एका मागोमाग एक सरप्राइज देत आहे.  आता 'बिग बॉस १७'चा नवा प्रोमो समोर आला आहे. 

बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे शोच्या दोन प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहेत. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य विकी आणि अंकितावर रागावताना दिसत आहेत. बिग बॉसने दोघांना विशेष सुविधा दिल्याचं घरातील सदस्यांनी म्हटलं आहे. 

प्रोमोमध्ये असे दिसून येते की, विकी आरशासमोर उभा असतो. तेव्हा युट्यूबर सनी आर्याला त्याच्या लूकमधील बदल लक्षात येतो आणि तो विकीला केस कापले आहेत का असे विचारतो. यानंतर सनी बिग बॉसला म्हणतो की त्यालाही केस कापण्याची गरज आहे. यानंतर मन्नाराही बिग बॉसला विशेष सुविधा मागताना दिसते. यानंतर करारात विकी आणि अंकिताने या गोष्टी मागितल्याचे बिग बॉस उघड करतता. यावरुन बिग बॉसच्या घरात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळते. 

'बिग बॉस १७' हे पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे. यात खासकरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.  सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रेग्नंट असल्याची तिला शक्यता जाणवत आहे. इतकंच नाही तर तिने यासाठी दोन वेळा प्रेग्नंसी टेस्टही केली आहे. त्यामुळे अंकिता खरोखरच प्रेग्नंट आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.  विशेष म्हणजे अंकिता जर खरंच प्रेग्नंट असेल तर बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडणार आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकारबिग बॉस