Join us

‘या’ लोकप्रिय साऊथ अभिनेत्रीसोबत Vicky Kaushalचं आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:03 IST

लग्न होण्याआधी विकी कौशल  (Vicky Kaushal) हरलीन सेठी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. कालांतराने विकी व हरलीनचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर विकीचं नाव साऊथच्या याच अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.

मालविका मोहनन (Malavika Mohanan )ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली मालविका सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. याचं मालविकाचं बॉलिवूड स्टार विकी कौशलसोबत खास नातं आहे.होय, कतरिना कैफसोबत लग्न होण्याआधी विकी कौशल  (Vicky Kaushal)हरलीन सेठी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. कालांतराने विकी व हरलीनचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर विकीचं नाव मालविकासोबत जोडलं गेलं होतं. दोघांना एकमेकांना मिठी मारतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकी व मालविका एकमेकांना डेट करत असल्याचं मानलं गेलं होतं. पण असं  काहीही नव्हतं. विकी व मालविकाचं खास नातं आहे. पण लोकांनी अर्थ काढला, तसं दोघांत काहीही नव्हतं.

मालविका अनेकदा विकी कौशलच्या कौटुंबिक कार्यक्रमातही दिसते. मुळात मालविकाचं आणि विकी कौशलच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. तर आज आम्ही त्याचबद्दल सांगणार आहोत. मुळात मालविका व विकी दोघंही बालपणीचे मित्र आहे. दोघंही एकमेकांचे क्लोज फ्रेन्ड आहेत. त्यामुळेच विकी व मालविका अनेकदा एकत्र फोटो शेअर करताना दिसतात. आता मालविका कतरिनाचीही चांगली मैत्रिण झाली आहे.मालविकाने साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. तसेच सुपरस्टार रंजनिकांत यांच्या ‘पेट्टा’ मध्येही तिच्या अभिनयाचं फार कौतुक झालं होतं.

मालविकाचं शिक्षण मुंबईत झालं. तिला पुढे शिकायचं होतं. पण काही जाहिरातीत काम करता करता अभिनयातील तिची रूची वाढली. मल्याळम सिनेमातून तिचा डेब्यू झाला. पत्तम पोले हा तिचा पहिला सिनेमा. यानंतर कन्नड सिनेमातही ती झळकली. 2018 मध्ये तिचा बॉलिवूड डेब्यूही झाला. ‘बियॉन्ड द क्लाऊड’ या सिनेमात ती इशान खट्टरसोबत झळकली. यात तिने इशानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.

टॅग्स :विकी कौशल