Join us

'हॉटेलच्या रुममध्ये मला नेलं मग...' विद्या बालनचा कास्टिंग काऊचबाबत खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:18 IST

विद्या बालनने साऊथ इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला.

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात सेलिब्रिटींना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले आहे. इंडस्ट्रीतील अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचीही नावे आहेत ज्यांनी कास्टिंग काऊचवर उघडपणे बोलले आहे. विद्या बालन या अभिनेत्रींपैकी एक आहे. कहानी, पा आणि शकुंतला देवी यासारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ४४ वर्षीय विद्या बालनने साऊथ इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला.

विद्या म्हणाली, सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला. त्यांना काय तोंड द्यावे लागले नाही? जवळपास 12 प्रोजेक्ट तिच्या हातातून गेले होते. दक्षिणेतील एका दिग्दर्शकाने तिला हॉटेलच्या खोलीत घेऊन जायचे होते.

विद्या म्हणाली होते की, ती एका दिग्दर्शकाला भेटण्यासाठी चेन्नईला गेली होती. तिने दिग्दर्शकाला कॉफी शॉपवर बसायला सांगितले पण एका रुममध्ये चल यासाठी ते मला जबरदस्ती करू लागले. मी एकटीच होते. अभिनेत्रीला त्याचा हेतू आधीच समजला होता, म्हणून तिने खोलीचा दरवाजा उघडा ठेवला आणि अवघ्या ५ मिनिटांत तो दिग्दरशक तिथून निघून गेला. परिणामी माझ्या हातून तो चित्रपटही गेला”. विद्याने त्या दिग्दर्शकाचं नाव न सांगता हा धक्कादायक प्रकार सगळ्यांसमोर सांगितला. 

टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटी