Join us

काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:27 IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Sai Pallavi: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'रामायण'मधून भारतीय संस्कृती आणि परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दसरा भाग दिवाळी २०२७मध्ये IMAX वर प्रदर्शित होणार आहे. अशातच मागील काही दिवसांपासून अभिनेत्री साई पल्लवी 'रामायण' मधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण, 'रामायण' हा तिचा डेब्यू सिनेमा नसून त्याआधी साई दुसऱ्याच चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. 

साई पल्लवी रामायण नाहीतर एक दिन या  चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. तेलुगू डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार, साई पल्लवी ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे त्या चित्रपटाचं नाव 'रामायण' नाही तर 'एक दिन' असं आहे. साई पल्लवीसह या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान देखील दिसणार आहे.

आमिर खान प्रॉडक्शन्स च्या बॅनरखाली 'एक दिन' हा बहुप्रतिक्षित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सुनील पांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या माध्यमातून आणि खान आणि मंसूर खान एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

टॅग्स :साई पल्लवीजुनैद खानरामायणबॉलिवूडसिनेमा