Kartik Aaryan Naagzilla Movie: हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर नाग-नागीणीवर आधारित अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. एकेकाळी इच्छाधारी नाग आणि नागिन यांच्या कथा सांगणारे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे. त्यानंतर आता बऱ्याच कालाधीनंतर इच्छाधारी नागाची गोष्ट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. हा चित्रपट म्हणजे नागजिला. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता कार्तिक आर्यन यामध्ये मुख्य भूमिकेत आहे.या सिनेमाच्या माध्यमातून करण जोहर पहिल्यांदाच प्रेक्षकांना सापांच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणार आहे.
'नागझिला' सिनेमात कार्तिक दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, कार्तिक आर्यनसोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे.यासाठी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला आणि प्रतिभा रांटा सारख्या अभिनेत्रींची नावे चर्चेत होती,परंतु त्यांच्या कास्टिंगबद्दलच्या चर्चा केवळ अफवा ठरल्या.अशातच या चित्रपटात एका साऊथ सुंदरीची एन्ट्री झाल्याची अपडेट समोर आली आहे.
व्हरायटी इंडियाच्या रिपोर्टनुसार, मल्याळम अभिनेत्री प्रीती मुकुंदनचं नाव नागझिला चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल झाल्याचं समजतं आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत असून या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि महावीर जैन यांनी केली आहे.
कोण आहे ही नायिका?
प्रीती मुकुंदनने २०२४ मध्ये 'ओम भीम बुश' या हॉरर कॉमेडी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.त्याचबरोबर तिने तेलुगू चित्रपट कन्नप्पामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Web Summary : Preity Mukhundhan is rumored to star opposite Kartik Aaryan in 'Naagzilla' as an 'ichchadhari nagin'. The film, directed by Mrigdeep Singh Lamba and produced by Karan Johar, will showcase a unique snake world. Mukhundhan debuted in the horror-comedy 'Om Bheem Bush'.
Web Summary : खबर है कि प्रीति मुकुंदन, कार्तिक आर्यन के साथ 'नागज़िला' में 'इच्छाधारी नागिन' की भूमिका निभा सकती हैं। मृगदीप सिंह लांबा द्वारा निर्देशित और करण जौहर द्वारा निर्मित यह फिल्म सांपों की एक अनोखी दुनिया दिखाएगी। मुकुंदन ने हॉरर-कॉमेडी 'ओम भीम बुश' से शुरुआत की।