Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! सोनू सूदच्या 'या' सवयीमुळे हैराण झाला त्याचा दुधवाला, म्हणाला - 'नाही झेलू शकतं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:41 IST

सोनू सूदने त्याच्या दुधवाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल होताना दिसतो आहे.

अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान अनेक मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू सूदने अनेकांना औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन मिळून देत आहे. त्यामुळे अनेकांसाठी सोनू सूद देवदूत बनला आहे. मात्र सगळीकडून सोनू सूदचे कौतुक होत असताना त्याचा दूधवाला गुड्डू मात्र खूप नाराज झाला आहे. 

दुधवाला गुड्डू चक्क त्याचा प्रश्न घेऊन सोनू सूदकडे गेला आहे. गुड्डू भैयाचा प्रश्न घेऊन सोनू सूदने चक्क त्याचा व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत दूधवाला सांगत आहे की, 'मी सोनू सूदमुळे खूप हैराण आहे. कारण लोक मला कधी पण फोन करतात आणि सोनू सरांशी बोलून माझी मदत करा असे सांगतात. त्यामुळे मी वैतागलो आहे. आता मी झेलू शकत नाही'

त्यावर सोनू सूद त्याला म्हणाला की,,'जो नागरिकांच्या मदतीसाठी फोन नंबर आहे. त्यावर फोन करायला सांग.' तर गुड्डू दुधवाल्याला अगदी चुकीच्यावेळी फोन केले जात असल्याचे त्याने सांगितले.

कोरोना काळात सोनू सूद अनेकांच्या मदतीसाठी धावला आहे. सोशल मीडियावर काही लोक विचित्र मागणीदेखील करताना दिसतात. अशीच एक विचित्र मागणी ट्विटरवर सोनू सूदकडे करण्यात आली. एका तरुणीने ट्विटरवर सोनू सूदला एक बॉयफ्रेंड मिळवून देण्याची मागणी केली होती आणि काही वेळात या मुलीची मागणी पूर्णदेखील झाली.

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्या